Video : पुण्यात एमपीएससी करणारी तरूणी अडकली सीसीटीव्हीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हाँगकाँग लेनमध्ये एका टी-शर्ट चोरणाऱ्या तरूणीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. 

दामिनी पथकाच्या बिट मार्शलने या मुलीला रंगेहाथ पकडले. पूजा जयसिंग असे या मुलीचे नाव असून शर्ट चोरतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून दामिनी पथकाने या मुलीला ताब्यात घेतले.  

पुण्यात मोबाईल फेकून मारल्याने फुटले महिलेच डोके

लाल रंगाचा टी शर्ट आणि जीन्स घालून पाठीवर बॅग अडकवून ही तरुणी शिरोळे मार्केटमध्ये आली होती. तिने तिथे एक-दोन टी शर्ट पाहिले. त्यानंतर एक शर्ट हातात घेऊन तो निरखू लागली. त्यानंतर पुढे जाऊन तिने कुणाचं लक्ष नाही हे पाहात हातातील टी शर्ट थेट बॅगमध्ये कोंबला.

या तरुणीच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत होत्या. तरुणीने बिल न भरताच टी शर्ट थेट बॅगमध्ये कोंबल्याने पाठिमागून तिला आवाज देण्यात आला. त्यानंतर तिने लगबगीने टी शर्ट बॅगेतून बाहेर काढला.

नजरेला नजर भिडताच झाला राडा; शाहरुखने दिली तक्रार

ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने या मुलीलाल पकडण्यास मदत झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a girl stoles t shirt at hongkong lane pune