युवतींना दिशा देणारे ‘स्वयंसिद्धा’ - सुनंदा पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

बारामती - उद्याचा तरुण आशावादी, ध्यास घेऊन यशस्वी झालेला बनवायचा आहे. गेली आठ वर्षे राज्यातील युवतींमध्ये सर्व क्षेत्रांतील नेतृत्व विकसित करण्यासाठी, त्यांना दिशा देण्याचे काम करण्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ सुरू आहे, असे मत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी शारदानगर येथे व्यक्त केले. 

बारामती - उद्याचा तरुण आशावादी, ध्यास घेऊन यशस्वी झालेला बनवायचा आहे. गेली आठ वर्षे राज्यातील युवतींमध्ये सर्व क्षेत्रांतील नेतृत्व विकसित करण्यासाठी, त्यांना दिशा देण्याचे काम करण्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ सुरू आहे, असे मत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी शारदानगर येथे व्यक्त केले. 

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या वतीने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने आयोजित आठव्या राज्यस्तरीय स्वयंसिद्धा संमेलनास आजपासून सुरवात झाली. या संमेलनात अध्यक्षीय भाषणात पवार यांनी वरील मत व्यक्त केले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा, दुबईतील मॅब एव्हिएशनचे संचालक मंदार भारदे, प्राचार्य राजकुमार देशमुख, प्रशांत तनपुरे, लोहोकरे, शिर्के आदी उपस्थित होते. तीन दिवसीय या संमेलनात राज्यभरातून सहाशेहून अधिक युवती सहभागी झाल्या आहेत.

पवार म्हणाल्या, ‘‘कदाचित आजचे चित्र तरुणींना निराशावादी वाटू शकते, मात्र उद्याच्या प्रश्नांची उकल करण्याएवढे तुम्ही प्रगल्भ झाले पाहिजे. त्यासाठीच स्वयंसिद्धाचा प्रयत्न आहे.’’

मंदार भारदे म्हणाले, ‘‘आज कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत, वातावरण त्यांच्या बाजूने आहे, तरीही आजही स्वतःबद्दल दुय्यमता त्यांच्या मनात आहे, ती का आहे हा प्रश्न पडतो. स्वतःचे स्वप्न पाहण्याची हिंमत आजच्या मुलींनी केली पाहिजे. कोणासारखे तरी होण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा. स्वतःसारखेच व्हा. त्यासाठीच स्वयंसिद्धासारख्या संमेलनाची आवश्‍यकता आहे.’’ आर. एस. लोहोकरे यांनी आभार मानले. 

सामाजिक कार्याचा बारामती हा रिचार्ज
मोबाईलची बॅटरी संपते, तेव्हा रिचार्जला करावे लागते. आजूबाजूला निराशेची भावना जिथे दिसते. तेव्हा माझ्यासारखे भारतभरातले अनेक जण बारामतीत येतात, येथे सामाजिक कार्याचा रिचार्ज घेतात आणि पुन्हा कामाला लागतात. पवार कुटुंबियांनी जे हे भव्य काम केले आहे, ते काम आमच्यासारख्या अनेकांना प्रेरणा देते. काळाच्या पुढे दोन पावले गरज ओळखून सुरू असलेली ही कामे निश्‍चितच सलाम करण्यासारखी आहेत, असे दुबईतील मॅब एव्हिएशनचे संचालक मंदार भारदे सांगितले.

Web Title: Girl Swayansiddha Sunanda Pawar