फेसबुक फ्रेंडने केला घात; तरुणीवर अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 October 2020

पुणे : फेसबुकवरुन ओळख झालेल्या व्यक्तीने तरुणीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचबरोबर तरुणीचे अश्‍लील छायाचित्र काढून ते व्हॉटस्‌अपवर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. 

पंकज रामनाथ उदावंत (वय 37, रा.साई चौक, मांजरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बारामती येथील 34 वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला 2018 मध्ये पंकजने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. तरुणीने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर त्याने हळूहळू तरुणीशी ओळख वाढविली. दरम्यान, तरुणीने त्याच्यावर विश्‍वास ठेवत त्याच्याशी मैत्री केली. काही महिन्यांपूर्वी पंकजने तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात बोलाविले, त्यानंतर तिला आपल्या बहिणीच्या घरी नेऊन तिथे तिच्यावर अत्याचार केले. मागील वर्षी तरुणी पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी पंकजने तिला त्याच्या घरी मुक्कामासाठी ठेवले. त्यावेळीही त्याने तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. 

गळ्यातील पट्ट्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला 'टायगर

दरम्यान, पंकजने तिचे अश्‍लील छायाचित्र काढून ते छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. त्याचवेळी त्याने तरुणीचा भाऊ व त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीला तरुणीचे अश्‍लील छायाचित्र पाठविले. या घटनेनंतर तरुणीने थेट बारामती पोलिस ठाणे गाठून पंकजविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार हडपसर येथे घडल्याने बारामती पोलिसांनी हे प्रकरण शून्य क्रमांकाने हडपसर पोलिसांकडे वर्ग केले. दरम्यान, हडपसर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत पंकजला अटक केली. 

बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी : फडवणीस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl was sexually assaulted by a person identified on Facebook Pune