त्या बहाद्दराने तरुणीला कारमध्ये बसविले अन्...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

मर्चंट नेव्हीच्या कोर्सचा खर्च करण्याचे आमिष दाखवून खासगी क्लासच्या शिक्षकाने तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.याप्रकरणी संबंधीत शिक्षकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हडपसर : मर्चंट नेव्हीच्या कोर्सचा खर्च करण्याचे आमिष दाखवून खासगी क्लासच्या शिक्षकाने तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी संबंधीत शिक्षकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा - इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, तिघांना अटक 

याप्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोसीन शेख (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील अशोका म्युज येथे १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, करियर गाईडन्स करणार्‍या एका कोचिंग क्लासेसमध्ये मोसीन शेख हा शिक्षक आहे. तरुणीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहे. त्याचा निकाल येणे बाकी आहे. गेल्या वर्षी आक्टोंबर २०१९ मध्ये मोसीन शेख याने तरुणी शिकत असलेल्या कॉलेजमध्ये करिअर गाईडन्सवर व्याख्यान दिले होते.

आणखी वाचा - पुण्याची सूत्रं हाती घेताच नव्या आयुक्तांनी काय केलं?

त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपला मोबाईल नंबर दिला होता. या तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. त्यासाठी तिने ४ जुलै रोजी मोसीन शेख याला फोन केला. त्यांनी कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार ही तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये मोसीन शेख याला भेटली. त्याने प्रवेश परिक्षेच्या फॉर्मचे १२०० रुपये आणि क्लासचे ७ हजार रुपये फी सांगितली. त्यानंतर ८ जुलैला क्लास सुरु झाला. पण ही तरुणी पैसे भरु शकत नसल्याने क्लासला गेली नाही. शेख याने तरुणीशी संपर्क साधून तिला कुंभारवाडा येथे बोलावले. तिला फीचे मी पाहतो, असे सांगून कारमध्ये बसवून अशोका म्युज येथे मित्राकडे काम असल्याचे सांगून तिला घेऊन गेला. तेथे त्याने या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला ही गोष्ट कोणाला सांगू नको, म्हणून धमकावले. दुसर्‍या दिवशी या तरुणीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिस मोसीन शेख याचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl was tortured by a private class teacher