मावळातील मुलींनी मिळवले दहावीच्या परीक्षेत यश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील माध्यमिक शाळांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे, मुलांच्या तुलनेत मुलींनी यशावर शिक्कामोर्तब केला आहे. खाजगी शिकवणी वर्गाशिवाय मिळविलेल्या गुणांमुळे सर्वच विद्यार्थी कौतुकाला पात्र ठरत आहे.

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील माध्यमिक शाळांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे, मुलांच्या तुलनेत मुलींनी यशावर शिक्कामोर्तब केला आहे. खाजगी शिकवणी वर्गाशिवाय मिळविलेल्या गुणांमुळे सर्वच विद्यार्थी कौतुकाला पात्र ठरत आहे.

ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांचे या निमित्ताने अभिनंदन करण्यात येत आहे. पालक, गावकरी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थेचे संचालक मंडळाने शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. वाहनगावच्या भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाने १००टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यालयात सोनाली खांडभोर (प्रथम), प्रज्ञा केंगळे(द्वितीय ), समाधाननगरकर (तृतीय ), न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बुद्रुक शाळेचा निकाल ९८ टक्के असून पठाण इम्रान ताजोद्दीन (प्रथम),  नेहा  असवले, अनिकेत बाळू (तृतीय) शासकीय आश्रम शाळा, वडेश्वर शाळेचा निकाल ९१.५२ टक्के लागला आहे.

विकास हेमाडे (प्रथम), गोविंदखाडे (द्वितीय), ऋषीकेश भाऊ मोरमारे (तृतीय), न्यू इंग्लिश स्कूल भोयरे शाळेचा निकाल ८२ टक्के असून ओंकार जालिंदर जाधव(प्रथम), वैष्णवी  पिंगळे (द्वितीय) प्रियंका ठाकर (तृतीय ) विना अनुदानित शासकीय आश्रम शाळा माळेगाव खुर्द शाळेचा निकाल ९६ टक्के असून ऋषीकेश राजकुमार टेकडे(प्रथम), संतोष चिंधू  (द्वितीय), राजेंद्र रामदास लाडके(तृतीय), वरसूबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव शाळेचा निकाल ८० टक्के असून सोनल अशोक आलम(प्रथम), विष्णू भिमाजी  पिंपरकर(द्वितीय), प्रज्ञा विठ्ठल  डेनकर(तृतीय),भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, घीणशेत शाळेचा निकाल ८० टक्के असून जयश्री चोरघे (प्रथम), शुभांगी चोरघे(द्वितीय), कोमल पालवे(तृतीय),प्रतिक विद्यानिकेतन निगडे शाळेचा निकाल ९१.५२ टक्के असून गौरी  पवार (प्रथम),प्रतीक्षा दळवी(द्वितीय ),श्वेता आगळेनी (तृतीय) क्रमांक पटकाविला. 

Web Title: girls of maval got success in ssc examination