भोई समाजाला सवलती द्या - बावणे

रमेश मोरे
गुरुवार, 17 मे 2018

जुनी सांगवी - देशात भोई समाज बहुसंख्येने राहत आहे. परंतु, संघटित नसल्यामुळे या समाजावर सतत शासन दरबारी अन्याय सहन करावा लागत आहे. समाजाला संघटीत करणे काळाची गरज आहे. राज्य शासनाने इतर समाजाप्रमाणे भोई समाजाला देखील सवलती द्याव्यात, असे मत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी दापोडी येथे व्यक्त केले. भोई समाज संघटनेच्या शाखा स्थापनेवेळी बावणे बोलत होते. 

दापोडी येथील नरवीर तानाजी पुतळा येथे राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल संघटनेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप गवते, प्रदेश महासचिव अभिषेक घटमाळ, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका स्वाती काटे, नगरसेवक राजू बनसोडे, महिला मंच प्रदेश अध्यक्षा उज्ज्वला वाघवले, पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब मोरे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा परिणिता तारु, पुणे जिल्हा विभाग प्रमुख बाळासाहेब गवते, युवा मंच प्रदेश महासचिव तुषार साटोळे, पुणे जिल्हा मच्छीमार संघ अध्यक्ष रामदास भोकरे, पुणे जिल्हा युवा मंच अध्यक्ष ज्योतिबा शिर्के आदी उपस्थित होते.

Web Title: Give concessions to Bhoi community - wither