'गोदामाची जागा मेट्रोला द्या'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पुणे - शिवाजीनगर धान्य गोदामातील अन्न धान्य वितरण विभागांची उर्वरित कार्यालये तातडीने स्थलांतरित करावी; तसेच गोदामांसाठी एकत्रित जागा न मिळाल्यास वेगवेगळ्या ठिकाणी विभागानुसार ही गोदामे स्थलांतरित करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रो मार्गांच्या पाहणी दरम्यान गुरुवारी केली. 

महामेट्रोच्या पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गाच्या कामाचा आढावा बापट यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गुरुवारी घेतला. शिवाजीनगर येथील धान्य गोदामाजवळ मेट्रोचे स्टेशन होणार आहे, तर कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मेट्रोचा डेपो होईल. धान्य गोदामातील इमारतींमध्ये पुरवठा विभाग, अन्न धान्य वितरण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाचे साहित्य तसेच, अन्नधान्य असल्याने या इमारती अद्याप मेट्रोकडे हस्तांतरित करण्यात आल्या नाहीत. या इमारती मेट्रोकडे देण्याबाबत काय अडचणी आहेत, याची माहिती पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. येथील मेट्रोच्या कामामुळे कामगार पुतळा येथील २०० झोपड्या बाधित होणार आहेत; तसेच राजीव गांधीनगर येथे ३६ झोपड्या बाधित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन तसेच मेट्रोच्या मार्गात येणाऱ्या ४०० झाडांचे पुनर्रोपण मेट्रोकडून करण्यात येणार आहे. या गोदामांमध्ये कार्यरत असणाऱ्या हमालांनाही मेट्रोने त्यांच्या सेवेत सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केली. 

Web Title: Give the godown space to the metro