प्लॅस्टिकला योग्य पर्याय द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - प्लॅस्टिकला योग्य पर्याय उपलब्ध नसल्याने हार्डवेअर व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, त्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला पाहिजे, अशी अपेक्षा या व्यावसायिकांनी व्यक्त केली. तसेच दाट वस्तीतील कोंडी टाळण्यासाठी हे व्यापारी शहराबाहेर जागा घेऊन हार्डवेअर हब उभारणार आहेत.

‘पूना हार्डवेअर होलसेल डीलर्स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांची बैठक ‘सकाळ’ने आयोजित केली होती. या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश जैन, प्रीतम बाफना, मनसूर गोधरावाला, दिनेश बाफना, जयंती जैन, धर्मेश शहा आणि दीपेश जैन उपस्थित होते. 

प्लॅस्टिक पिशव्यांना योग्य पर्याय नसल्याने हार्डवेअरच्या साहित्याची ने-आण करण्यास अडचणी येत आहेत. यातील काही साहित्य लवकर खराब होते. कापडी आणि कागदी पिशव्या या साहित्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. तसेच साहित्याच्या पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकला सक्षम पर्याय नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा सूर बैठकीत निघाला. त्याचबरोबर प्लॅस्टिकबंदी ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असल्याने दुसऱ्या राज्यात मालाची देवाण-घेवाण करताना समस्या येतात. 

मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांतून हार्डवेअरचा माल येतो, तेव्हा त्याचे पॅकिंग प्लॅस्टिकने केलेले असते. तसेच राज्याबाहेर हा माल पाठविताना प्लॅस्टिकमध्ये पॅक करून देण्याची मागणी तेथील व्यापारी करतात, अशा अडचणी व्यापाऱ्यांनी मांडल्या. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हार्डवेअर साहित्याच्या वाहतुकीत बराच वेळ जातो. तसेच लांब पाइप आणि सळयांची टेंपोतून वाहतूक केल्यास पोलिस कारवाई करतात. असे अनेक प्रश्‍न या व्यवसायासमोर आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. पुण्यामध्ये हार्डवेअर साहित्याचे घाऊक विक्रेते २०० आहेत, त्यातील १४६ जण संघटनेचे सदस्य आहेत. घाऊक व्यवसाय शहराच्या बाहेर नेण्यासाठी संघटना प्रयत्न करत असून, किमान १० एकर जागेत हार्डवेअर हब उभारणार आहे. 

शहरातील हार्डवेअर व्यवसाय
 असोसिएशनची स्थापना २००३ मध्ये.
 पुण्यात वर्षाला एक हजार कोटींची उलाढाल.
 हार्डवेअरमध्ये १० हजारांपेक्षा जास्त प्रकारचे साहित्य.
 दाट वस्तीत व्यवसाय आल्याने वाहतुकीची समस्या.
 जीएसटी १८ वरून १२ टक्के करण्याची मागणी

Web Title: Give the option to the plastic poona hardware wholesale dealers association