'तंत्र, कौशल्याची शेतीला जोड द्या'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - कष्टाने शेती कशी करायची, हे शेतकऱ्यांना सांगण्याची आवश्‍यकता नाही. कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ शेतीमधील आधुनिक तंत्रे व कौशल्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे मत राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रविवारी व्यक्त केले. 

‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’ (एसआयएलसी)ने आयोजित केलेल्या कृषी ज्ञान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ‘सकाळ माध्यम समूहा’च्या डीसीएफ ॲडव्हायजरीचे संचालक बॉबी निंबाळकर, ‘एसआयएलसी’च्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.  थोडी आधुनिक तंत्राची जोड मिळाली तर शेतकरी प्रगती करू शकतात. आजपर्यंत शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती केली. केवळ माती पाहून कोणते पीक कसे येईल, असे काही शेतकरी सांगतात. हवामान खातेदेखील सांगू शकणार नाही असा अंदाज काही जुने शेतकरी सांगतात. हे कौशल्य मौल्यवान आहे, त्याला अजून आधुनिक कौशल्ये शिकवली गेली, तर प्रगती वेगाने होईल, असेही निलंगेकर म्हणाले.

मी मराठवाड्याचा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या बघत आलेलो आहे. मंत्री झाल्यानंतर मला माझे व्हिजन विचारले गेले. लग्न ठरवताना शेतकऱ्याच्या घरात मुलगी देण्यासाठी आता कोणीही तयार होत नाही; पण हे चित्र बदलवून शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देणे आणि शेतकऱ्यांच्या मुलालाच मुलगी देण्यासाठी आवश्‍यक ठरणारे वातावरण तयार करणारे माझे व्हिजन आहे.

- संभाजी पाटील निलंगेकर, कामगार व कौशल्य विकासमंत्री

Web Title: Give pair farming skills