पुणे : सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकीत विद्यावेतन द्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेवर शासनाने टाकलेले निर्बंध उठवावेत

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेवर शासनाने टाकलेले निर्बंध उठवावेत आणि सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकलेले विद्यावेतन सुरु करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत यांनी ही मागणी केली आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात शनिवारी सकाळी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात खासदार छत्रपती संभाजीराजे, डॉ. सदानंद मोरे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, सकल मराठा क्रांती मोर्चा, राज्यातील सारथीचा लाभ घेणारे विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.

JNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या...

राष्ट्रपती राजवटीच्या काळात या संस्थेवर ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव जे. पी .गुप्ता यांनी संस्थेवर निर्बंध घातले आहेत. ते निर्बध उठवावेत आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर विद्यावेतन मिळावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. तसेच जे .पी . गुप्ता यांना निलंबित करावे, अशीही त्यांची मागणी आहे. सारथीवरील निर्बंध हटवल्याचे शासन परिपत्रक काढावे, असे आवाहनही सरकारला यावेळी करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Pending Stipend to Students who benefited of Sarathi Scheme