esakal | 'सकाळ' इम्पॅक्ट : 'सीईटी'ची आणखी एक संधी द्या; विना-अनुदानित संस्था संघटनांनी केली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Exam

'सीईटी'चा निकाल लावताना ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही त्यांनाही विचारात घेऊन निकाल लावला पाहिजे, अन्यथा पर्सेंटाइलचे घसरून विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

'सकाळ' इम्पॅक्ट : 'सीईटी'ची आणखी एक संधी द्या; विना-अनुदानित संस्था संघटनांनी केली मागणी

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश परीक्षेसाठी 35 टक्‍क्‍यांपर्यंत अनुपस्थिती असल्याने संस्थाचालकही चिंतेत पडले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत किंवा अर्ज भरूनही परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. याकडे उच्चतंत्र शिक्षण विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऍडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया (ग्रामीण भागातील विना अनुदानित संस्था संघटना) या संघटनेची बैठक रविवारी (ता.19) पुण्यात झाली. त्यामध्ये हा ठराव करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ, संघटनेचे सदस्य प्रा. प्रकाश पाटील, राजीव जगताप आदी सदस्य उपस्थित होते.

पुणे - बंगळुरु 'हायवे'वर 'बर्निंग कार'चा थरार! 'नॅनो कार'ने अचानक घेतला पेट​

प्रा. रामदास झोळ म्हणाले, ''सीईटीला विद्यार्थी संख्या कमी असल्याचे आमच्या लक्षात आले, पण 'सकाळ'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे याची वस्तुस्थिती समोर आली. राज्य सरकारने अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या पदवीच्या प्रवेशासाठी पात्रतेसाठी 50 टक्के गुणांची मर्यादा 45 टक्के केली. पण हा निर्णय घेण्यास उशीर घेतल्याने इयत्ता 12वीत 50 टक्के पेक्षा कमी आणि 45 पेक्षा जास्त गुण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सुधारित मुदतीत 'सीईटी'चा अर्ज भरला नाही. हे विद्यार्थी आता पात्र ठरू शकतात. त्यामुळे त्यांना संधी देऊन लगेच परीक्षा घेणे शक्‍य आहे.''

पुणे शहर क्रांती सेना महाविद्यालयीन विभागाने विद्यार्थ्यांना 'सीईटी देण्याची आणखी एक संधी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने प्रवेशाचे निकष उशीर बदलले, अनेकांनी परीक्षा दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी अशी मागणी अध्यक्ष श्‍याम फासगे यांनी केली आहे. उपाध्यक्ष दौलत धेंडे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, ऍड. चंद्रकांत घाणेकर, माधुरी सांगळे, सुरेश जैन, जावेद खान यांनी केली आहे.

पुण्याच्या 'मिनिएचर आर्टिस्टने साकारली अवघ्या तीन मिलिमीटरची विठ्ठलाची मूर्ती​

निकालात अनुपस्थित विद्यार्थ्यांचा विचार करा
'सीईटी'चा निकाल लावताना ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही त्यांनाही विचारात घेऊन निकाल लावला पाहिजे, अन्यथा पर्सेंटाइलचे घसरून विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. 'सीईटी'ची परीक्षा दिवसभरात विविध सत्रात होते, त्यातील उपस्थितीचे प्रमाणही भिन्न असणार आहे. ज्या सत्रात उपस्थिती जास्त त्या सत्रातील विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल चांगले येईल, पण जेथे कमी आहे त्यांचे पर्सेंटाइल घसरले. त्यामुळे त्यांना प्रवेश घेतानाही अडचणी येतील. 'सीईटी' सेलने अनुपस्थित विद्यार्थ्यांना शून्य गुण देऊन निकालात ग्राह्य धरल्यास हे नुकसान टळू शकेल, अशी मागणी आयआयटीन्स संचालक केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)