esakal | पुणे : नऊ मीटरच्या रस्त्यांना टीडीआर द्या
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

पुणे : नऊ मीटरच्या रस्त्यांना टीडीआर द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर (TDR) वापरून, बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवरील (Road) जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. तो मार्गी लावण्यासाठी नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून निर्माण होणारा टीडीआर वापरण्यास परवानगी (Permission) द्यावी. जेणेकरून सोसायट्यांचा पुनर्विकास आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन हे दोन्ही विषय मार्गी लागतील, अशी मागणी सोसायटीधारकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महापालिकेच्या हद्दीत नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरून बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या जुन्या हद्दीतील अनेक सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने सहा मीटर रुंदीच्या रस्त्याचे दोन्ही बाजूने रुंदीकरण करून, तो नऊ मीटर करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या प्रस्तावावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. अशा प्रकारे रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास नागरिकांनीदेखील मोठ्या प्रमाणावर विरोध केला. तसेच त्याची प्रक्रियादेखील वेळखाऊ आहे. त्याचा फटका जुन्या सोसायट्यांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: टेमघर सह चार धरण १०० टक्के भरली

टीडीआरला किंमत नसल्यामुळे शहरात झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला असल्याचे अजित पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात सांगितले होते. एसआरएचा टीडीआर नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर वापरण्यास परवानगी दिली, तो सोसायटीधारक आणि झोपडीधारक या दोघांचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो.

- आशिष ठोंबरे, अश्विनी अपार्टमेंट्स, हॅपी कॉलनी, कोथरूड

loading image
go to top