पुरकर, नाईक, लाटकर, सुभाष यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण 

पिंपरी - नाट्य-चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (ता.८) सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. गायक आणि अभिनेता अजय पुरकर (बालगंधर्व पुरस्कार), अभिनेता दिगंबर नाईक (आचार्य अत्रे पुरस्कार), अभिनेते राहुल सोलापूरकर (अरुण सरनाईक पुरस्कार), लेखक शिरीष लाटकर (जयवंत दळवी पुरस्कार), अभिनेत्री अमृता सुभाष (स्मिता पाटील पुरस्कार) आदी मुख्य पुरस्कार दिले जाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील असतील. महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राहुल भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. 

या प्रसंगी परिषद व शहरातील काही नाट्यसंस्थांमधील कलाकार ‘कलाकारी’ हा प्रभाकर पवार लिखित करमणुकीचा कार्यक्रम सादर करतील.   

अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे - रंगमित्र - नाट्यलेखक व कलाकार नेताजी भोईर (नाशिक). विशेष पुरस्कार - रवींद्र कदम, पद्मजा कुलकर्णी, रवी पाटील, भाऊसाहेब सांगळे, सोनाली गायकवाड, चेतन चावडा, साधना जोशी.

पुरस्कारासाठी कलाकार निवडताना नवीन आणि जुन्या पिढीची सांगड घातली आहे. नव्या पिढीतदेखील प्रतिभासंपन्न कलाकार आहेत. त्यांच्या प्रतिभेचे कौतुक व्हावे, हा उद्देश पुरस्कार देण्यामागे आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलाक्षेत्रासाठी केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे.
- भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

Web Title: glory by marathi natya parishad