देवलापार गो-अनुसंधान केंद्रातील विकासकामांचा शुभारंभ

देवलापार गो-अनुसंधान केंद्रातील विकासकामांचा शुभारंभ
Published on: 

देवलापार (जि. नागपूर) : गो-अनुसंधान केंद्रातील विकासकामांच्या प्रारंभ सोहळ्याला उपस्थित सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आदी.

भारतीय परंपरेनुसार जीवन
घडविणे काळाची गरज

सरसंघचालक भागवत : गो-अनुसंधान केंद्रातील विकासकामांचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
देवलापार (जि. नागपूर), ता. ७ : ‘‘शब्द हवेत विरून जातात; मात्र केलेले कार्य अमर होते. स्वतःचे व देशाचे रक्षण, धर्म-संस्कृतीचे जतन तसेच जगाच्या कल्याणासाठी भारतीयांनी परंपरेनुसार जीवन घडवून कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देवलापार येथील गो अनुसंधान केंद्रातील विविध विकासकामांचा प्रारंभ डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी ते बोलत होते. गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्राच्या ३० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला.


गो विद्यापीठ उभारण्याची घोषणा

यावेळी ‘आर.सी. प्लास्टो’च्या ‘सीएसआर’ उपक्रमाच्या सहकार्याने उभारलेले ‘ऑर्गेनिक मॅन्युअर युनिट, देशी गोवंश सुधारणा व संवर्धनासाठी ‘आयव्हीएफ युनिट’, रामदेवबाबा विद्यापीठाच्या सहकार्याने निर्मित विद्युत निर्मिती युनिट अन् ग्रामीण रोजगाराला चालना देणाऱ्या ‘राणी दुर्गावती ग्रामीण हाट’चे लोकार्पण करण्यात आले. तसेच पंचगव्य कॅन्सर वेलनेस सेंटर आणि गो-विद्यापीठ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.


०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com