

‘अमूल’पाठोपाठ ‘गोकुळ’ दूधही दोन रुपयांनी महाग
कोल्हापूर : इंधन आणि सीएनजी दरवाढीनंतर आता दुधाच्या किमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे.
वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पशुखाद्य, वाहतूक, प्रक्रिया आणि वितरण खर्च वाढल्याने दूध व्यवसायावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दूध दरवाढ अपरिहार्य असल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले.
अमूलनंतर गोकुळनेही दरवाढ केल्याने राज्यातील इतर दूध संघांकडूनही दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच, दुग्धजन्य पदार्थांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दरांचा काही प्रमाणात फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र ग्राहक आणि उत्पादक यांच्यात समतोल राखण्याचे मोठे आव्हान दूध संघांसमोर उभे राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.