लॉकडाऊनमध्येही सोन्याचे भाव चढेच, साडेतीन हजार रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

राज्यात साधारणतः १५ दिवसांपूर्वी लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा वगळता सराफी बाजारपेठेसह  सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु, सोन्याच्या भावावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, त्यात वाढच होत आहे. 
 

पिंपरी : मागील २ आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून सर्वत्र लॉकडाऊन चालू असताना सोन्याचे भाव चढतेच राहिले आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आतापर्यंत सोने जवळपास साडेतीन हजार रुपयांनी वाढले आहे. 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात साधारणतः १५ दिवसांपूर्वी लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा वगळता सराफी बाजारपेठेसह  सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु, सोन्याच्या भावावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, त्यात वाढच होत आहे. 

हेही नक्‍की वाचा : रेल्वेचा मोठा निर्णय ! प्रवाशांना 100 टक्‍के परतावा 
पिंपरी चिंचवड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा म्हणाले, "स्थानिक बाजारपेठेतील व्यवहार बंद झाले आहेत. त्याने, सोन्याचे भाव देखील स्थिर रहायला हवेत, असे सर्व सामान्य लोकांना वाटते. परंतु, तसे होत नाही. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी सोन्याचे भाव ४३ हजार रुपये इतके होते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत सोन्याचे भाव चढतेच राहिले आहेत. सध्या जागतिक पातळीवरील मोठ्या व्यवहारात सोन्याची खरेदी-विक्री चालू आहे. अनेकदा हे व्यवहार तोंडी चालत असतात. त्यामुळे, सोन्याचे भाव वाढत आहेत. शहरातील २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ४३ हजार ५०० रूपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४ हजार ६४० रूपये इतका आहे."

हेही नक्‍की वाचा : मोठा निर्णय ! महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन घेण्याचे विचाराधिन 
 सध्या आपल्याकडे चलन किंवा रोकड  स्वरूपातील व्यवहार थंडावले आहेत. स्थानिक पातळीवर कामगारांअभावी सराफी बाजार पेठेत छुपे व्यवहार करणे शक्य होत नाही. सोन्याचे भाव बदलते राहतात. त्यामुळे, लॉकडाऊन उठल्यावर सोन्याचे भाव वेगळे राहतील, असेही सोनिगरा यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices rise by Rs 3000 during lockdown