

Gold Silver Price Fall january to april 2026
esakal
Gold rate decline India : जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असली, तरी वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या तुलनेत सध्या हे दर मोठ्या प्रमाणात उतरल्याचे झाल्याचे चित्र आहे. चांदी आपल्या उच्चांकी दरापेक्षा तब्बल मागच्या ४ महिन्यात २ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर सोन्याच्या दरातही ५३ हजार रुपयांची घट पाहायला मिळत आहे.