Golden Boy : रस्त्यावर अवतरला गोल्डन बॉय रुद्र; परदेशी संकल्पना आता पुण्यातही

बाणेर बालेवाडी येथील रस्त्यावर किंवा बालेवाडी हाय स्ट्रीट भागात सध्या 'गोल्डन बॉय रुद्र' सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Golden Boy
Golden BoySakal
Summary

बाणेर बालेवाडी येथील रस्त्यावर किंवा बालेवाडी हाय स्ट्रीट भागात सध्या 'गोल्डन बॉय रुद्र' सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बालेवाडी - बाणेर बालेवाडी येथील रस्त्यावर किंवा बालेवाडी हाय स्ट्रीट भागात सध्या 'गोल्डन बॉय रुद्र' सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे कारण म्हणजे संपूर्णपणे सोनेरी रंगाचे कपडे ,टोपी ,बूट, डोळ्यांवरचा चष्मा घालून हा मुलगा तासंतास एखाद्या पुतळ्यासारखा उभा राहतो .परदेशात ही कला पहायला मिळते, आता पुण्यातही रुद्राच्या रुपाने ही कला पाहायला मिळत आहे .

गोल्डन बॉय रुद्र सध्या बाणेर येथील डी मार्ट समोर उभा असतो. दोन महिन्यांपूर्वी तो मुंबईहून पुण्यात आला, आधी फर्ग्युसन रस्ता व आता बाणेर बालेवाडी भागांमध्ये तो आपली कला सादर करत आहे. दररोज संध्याकाळी सहा ते साडे दहाच्या दरम्यान रुद्र एका सोनेरी पुतळ्यासारखा उभा राहतो, समोर सोनेरी डबा ठेवला असून या डब्यामध्ये लोक पैसे टाकतात. तर आँनलाईन पेमेंटसाठी डब्यावर क्यू. आर. कोडचे कार्ड ठेवण्यात आले आहे.

लहान मुल, तरुण-तरुणी आवर्जून त्याच्याबरोबर फोटो काढतात. रुद्र प्रजापती हा मूळचा उत्तर प्रदेशात राहणारा असून त्याचे आठवीपर्यंतचे शिक्षण झालेले असून त्याचे आई-बाबा शेती करतात. परदेशातील कलाकारांचे युट्युब वर व्हिडिओ पाहून आपणही असे काहीतरी करू शकतो यातून तो या कलेकडे वळला. एखाद्या पुतळ्यासारखे जागेवरती हात हवेत अधांतरी ठेवून तासं तास उभे राहणे अवघड असून त्यासाठी खूप सराव करावा लागतो असे रुद्रने सांगितले. रुद्र बरोबर त्याच्या गावातील एक मित्र ही , ही कला सादर करतो. तो सध्या मुंबईमध्ये आहे तर रुद्र पुण्यामध्ये हे काम करतो. या कामातून त्याला थोडे पैसे मिळतात. कधीकधी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी ही रुद्र बोलावले जात असल्याचे त्यांने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com