

नगरसेवक शिव शर्मा,
राहुल श्रीवास यांना कारावास
गोंदिया, ता. २५ ः कुडवा (गोंदिया) येथील हाॅटेल ग्रँडसितामध्ये माजी आमदार गोपालदास अग्रवाल व त्याचे पुत्र विशाल अग्रवाल यांच्यावर दहा वर्षांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने नगरसेवक शिव शंकरलाल शर्मा आणि राहुल हेमराज श्रीवास यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकरणातील अन्य चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ९ एप्रिल २०१६ रोजी हाॅटेल ग्रँडसितामध्ये काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान शिव शर्मा व राहुल श्रीवास यांनी तेथे येऊन माजी आमदार गोपालदास अग्रवाल, त्यांचे पुत्र विशाल अग्रवाल व अन्य पदाधिकाऱ्यांवर हल्ला करून मारहाण केली होती. या घटनेनंतर रामनगर पोलिस ठाण्यात शिव शर्मा यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.