esakal | पुण्यात पीएमपीची प्रवाशांना खूषखबर
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML

पुण्यात पीएमपीची प्रवाशांना खूषखबर

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : पीएमपीने (PMPML) दिली पुणेकरांना (PUNE) खूषखबर... पुणे आणि पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहरात पीएमपीच्या बसमधून फिरण्यासाठीचा दैनिक पास आता अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध होणार आहे. फक्त पुणे शहरात दिवसभर फिरायचे असल्यास दैनिक पास 40 रुपयांना मिळणार असून त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये फिरण्यासाठीही अवघ्या 40 रुपयांत दैनिक पास मिळणार आहे. पीएमपीच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने गुरुवारी फेटाळला.

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नितीन लांडगे, संचालक प्रकाश ढोरे, पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे आदी संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित होते. त्यानंतर महापौर मोहोळ यांनी पासच्या कमी झालेल्या दरांची माहिती दिली.

हेही वाचा: Baramati : कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी बारामतीत प्रशासन सज्ज

पीएमपीचा दैनंदिन प्रवासाचा पास सध्या 70 रुपयांना आहे. त्याची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यानुसार आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत फिरायचे असल्याचे प्रवाशांना 50 रुपयांना पास मिळणार आहे. त्यासाठीचा मासिक पास आता 1200 रुपयांना मिळेल. तर फक्त पुणे शहरात फिरायचे असल्यास 40 रुपयांत दिवसाचा पास मिळेल. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात फिरायचे असल्यास दैनिक पास 40 रुपयांना मिळेल, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

दरम्यान प्रवासी तिकिटात दरवाढ कऱण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला. पीएमपीच्या मिळकतींचे विकसन करण्यासाठी सर्वेक्षणास संचालक मंडळाने मंजुरी दिली. तर, डिझलेवरील बसचे सीएनजीमध्ये रुपांतर करण्यासाठी सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टचा (सीआयआरटी) अहवाल मागविण्याचा आदेश संचालक मंडळाने दिला.

हेही वाचा: पाषाण : 'एनसीएल कॉलनी'तील 11 चंदनाची झाडे चोरीला

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पीएमपीच्या दैनंदिन पासचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासी संख्या वाढेल, असा अंदाज आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.'

loading image
go to top