पुणेकरांना दिलासा; 482 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी पोचले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

 एकीकडे सर्वाधिक 482 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी पोचले; तेव्हाच आत्तापर्यंत सुमारे दहा हजार रुग्ण ठणठणीत झाले आहेत. दुसरीकडे, तर मृतांची संख्या कमी होऊन ती दिवसभरात पाचपर्यंत खाली आली. 

पुणे -  कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकड्यांनी घाबरलेल्या पुणेकरांना सोमवारी (ता. 29) मात्र दुहेरी दिलासा मिळाला. एकीकडे सर्वाधिक 482 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी पोचले; तेव्हाच आत्तापर्यंत सुमारे दहा हजार रुग्ण ठणठणीत झाले आहेत. दुसरीकडे, तर मृतांची संख्या कमी होऊन ती दिवसभरात पाचपर्यंत खाली आली. यापुढे कोरोनापासून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढेल, अशी आशा महापालिकेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, दिवसभरात 617 नवे रुग्ण सापडले असून, सध्या 6 हजार 195 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, गंभीर बाब म्हणजे 333 रुणांची प्रकृती गंभीर असून, 61 जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सर्व मृत हे 45 पेक्षा अधिक वयाचे आहेत. त्यांना अन्य आजारही असल्याची नोंद आहे. 
पुण्यात आत्तापर्यंत 1 लाख 12 हजार 41 जणांची तपासणी केली असून, त्यापैकी 16 हजार 462 जणांना कोरोना झाला आहे. त्यातून 9 हजार 929 बरे झाले आहेत. रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for punekar 482 patients corona-free

टॅग्स
टॉपिकस