Pune News : यावर्षी पाऊस चांगला अन्नधान्य मुबलक: मुख्य पुरोहित यतीन कुलकर्णी यांचे भाकीत

गावकऱ्यांसमोर पंचांग वाचन: तीनशे वर्षाची परंपरा; डी. के वळसे पाटील
Pune News
Pune Newsesakal

मंचर : "यावर्षी पाऊस वाण्याच्या घरी आहे .पाऊस जरा तोलून मापून सर्वत्र चांगला पडेल. अन्नधान्य मुबलक होईल .आगीपासून चोरापासून त्रास वाढेल. रक्ताचे विकार वाढतील "असे भाकीत अवसरी खुर्द (आंबेगाव) येथील मुख्यपुरोहित यतीन कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

Pune News
Jalgaon News : प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या चौदाशे कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’; जळगाव-रावेर मतदारसंघ

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी गावकऱ्यांसमोर पंचांग पूजन व वाचन यतीन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी वर्षभर होणारे विविध अंदाज व्यक्त केले. याप्रसंगी श्री काळभैरवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामदास भोर , संचालक सुरेशराव भोर, संजय वायाळ , ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कराळे,उद्योजक निलेश टेमकर,दीपक ठेबेकर .रामदास टेमकर कल्याण शिंदे सचिन ढोणे, प्रवीण टेमकर पोलीस पाटील संतोष शिंदे ,सुरेश गुरव -यांच्यासह ग्रामस्थउपस्थित होते.

Pune News
Jalgaon News : कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर! 29 उपाध्यक्ष, 42 सरचिटणीस, 51 चिटणीस

यतीन कुलकर्णी म्हणाले"खरिपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल .यावर्षी वरून नावाचा मेघआहे .यज्ञ याग भरपूर होईल पंचांगं मधील नित्य तिथीच्या श्रवणाने लक्षमी प्राप्त होईल. वाराच्या श्रवणाने आयुष्यवृद्धी होईल .नक्षत्राने पातक जाईल. योगाने रोगाचे निवारण होईल .तसेच कर्णाच्या श्रावणाने चिंतित मनोहर सिद्ध होईल. सर्वांच्या नित्य श्रवणाने सर्व मानव सुखी होईल" दरम्यान महादेव मंदिरात आडी पूजन करण्यात आले. मोहन अभंग, बबनराव शिंदे यांनी व्यवस्था पाहिली.

"यावर्षी क्रोधी नामसंवस्तर आहे .त्यामुळे लोकांमध्ये राग वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वांनी मन शांत ठेवून शांतता मार्गाने वाटचाल करावी."

यतीन कुलकर्णी पुरोहित्य ,अवसरी खुर्द (आंबेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com