'सकाळ'च्या दहावी विद्यार्थी कार्यशाळेला मंचरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

valase patil
valase patil

मंचर : दहावीचा बदलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समूह व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (NCRD) यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन हजाराहून अधिक विद्यार्थी, पालक व शिक्षक यावेळी उपस्थित होते. 

कार्यशाळेचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. शिक्षण तज्ञ डॉ. अ.ल.देशमुख, बालभारती इंग्रजी भाषा समितीच्या सदस्या डॉ. श्रुती चौधरी व भाषा अभ्यासक व समुपदेशक लतीफ शाह यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात अभ्यासक्रमाविषयी असलेल्या शंका दूर झाल्या. मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा. यांचे तंत्रही पालकांना समजले. १७ शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील उद्घाटन करून पुढील कार्यक्रमास जाणार होते. पण कार्यशाळेतील तज्ञाचे मार्गदर्शन व विद्यार्थ्याचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून कार्यक्रम संपेपर्यंत तब्बल तीन तास वळसे पाटील थांबून होते. प्रास्ताविक ‘सकाळ’चे बातमीदार डी.के.वळसे पाटील यांनी केले. पाहुण्याचे स्वागत वितरण व्यवस्थापक योगेश निगडे व वितरणचे सहाय्यक व्यवस्थापक दीपक महाडिक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन केशव टेमकर यांनी केले. शशिकांत जगताप, गणेशा चव्हाण, निलेश देशमुख यांनी व्यवस्था पहिली. 

सकाळ ने पुढाकार घेऊन पथदर्शी प्रकल्प राबवावा - वळसे पाटील 
विद्यार्थ्यांमधील स्पार्क शोधून काढा. त्यांच्या आवडीनुसार त्याला क्षेत्र निवडण्याचे स्वतंत्र दिल्यास तो यशाच्या शिखरावर निश्चित जाईल. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. आंबेगाव तालुक्यात समुपदेशनासाठी सकाळ ने पुढाकार घेऊन पथदर्शी प्रकल्प राबवावा. या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्रामार्फत केला जाईल.’’ अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, “दहावीचा बदलेला अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती विषयी विद्यार्थी शिक्षक व पालकांना कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन करण्याचा सकाळचा उपक्रम कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा सकाळच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शनाचे आयोजन केले जाईल. आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या निवासाचा प्रश्न दूर होण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून एक कोटी रुपये घोडेगाव येथे वसतिगृह बांधण्यासाठी दिले आहेत. समाजातील नेमके प्रश्न शोधून त्यावरील उपाययोजना करण्याची नानासाहेब परुळेकर यांनी सुरु केलेली परंपरा प्रतापराव पवार व अभिजित पवार समर्थपणे पार पाडत आहेत. याचा समाजाला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय व आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून नियमितपणे अभ्यास करावा. शिक्षण व्यवस्थेतील प्रचलित पद्धत बदलून व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे आहे.’’ 

विद्यार्थ्यांना, पालकांना, व शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, कृतीपत्रिका, या विषयी खूप कुतूहल आहे हे जाणवले. इंग्रजी, विज्ञान व समुपदेशन तसेच ज्ञानरचना वाद याविषयी तज्ञांनी माहिती दिली. कार्यक्रमानंतर  शिक्षक , पालकांनी कृतीपत्रिके विषयी आणखी मार्गदर्शन हवे हि ईच्छा व्यक्त केली. या कार्यशालेतून आम्हाला नेमकी परीक्षा कशी होणार, प्रश्न कसे असतील, स्वमत म्हणजे काय, मूल्यमापन कसे होईल हे पहिल्यांदाच पण व्यवस्थित समजले.    
- डॉ. अ.ल.देशमुख, शिक्षण तज्ज्ञ  

इंग्लिश विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तका मधील सर्व कृतींचा सराव करणे गरजेचे आहे. लेखन कौशल्यावर आधारित कृतींसाठी इंग्रजी भाषा भरपूर बोलणे, इंग्रजी वाचणे आवश्यक आहे तसेच इंग्रजी  शब्दांचा संग्रह वाढविणे सुध्दा महत्त्वाचे आहे.
- डॉ. श्रुती चौधरी, सदस्या, बालभारती इंग्रजी भाषा समिती  

विद्यार्थी व पालकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे सकाळ दहावी व्याख्यानमाला उपक्रमाची उद्दिष्टे साध्य झालेले आहे. मुलांना अभ्यास कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र देणे हे किती गरजेचे आहे, हे पालकांच्या प्रतिक्रियेतून जाणवले. मुलांना नवीन बदललेल्या अभ्यासक्रमातून विकसित होणाऱ्या क्षमतांची जाणीव करून देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली.
- लतीफ शाह, भाषा अभ्यासक व समुपदेशक

सकाळच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा संभ्रम दूर झाला आहे. परीक्षेविषयी भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढला आहे. विविध लिंक पाहणे व क्यू आर कोड तसेच दिशा अॅप विषयी माहिती मिळाली. बदलेल्या अभ्यासक्रमाविषयी परिपूर्ण माहिती मिळाली. 
- सुनील वळसे पाटील, मुख्याध्यापक

सकाळ समूहाने व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संस्थेने नवीन १० वि च्या बदललेल्या अभ्यासक्रमावर या कार्याश्लेतून आम्हाला बहुमोल मार्गदर्शन मिळाले याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तसेच सकाळने जनता विद्या मंदिर येथे माळीन वसतिगृह स्थापन केले यासाठी मी त्यांचे आभार मानते. 
- फाल्गुनी राम वागदरे, विद्यार्थीनी  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com