"गूगल'वर शोधा जवळचे "एटीएम' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे - जगभरातील प्रचंड माहितीचा साठा असणारे आणि एका क्‍लिकवर हव्या त्या गोष्टीबद्दल माहिती पुरवणारे "गूगल' हे संकेतस्थळ आता नोटाबंदीच्या समस्येवरही उपाय शोधून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून आले आहे. एखाद्या बॅंकेचे एटीएम आपल्या आसपास नक्की कुठे आणि किती अंतरावर आहे, हे "गूगल'च्या मदतीने आता एका क्‍लिकवर शोधता येणार आहे. 

त्यासाठी "गूगल'ने आपल्या होमपेजवर "फाइंड ऍन एटीएम निअर यू' अशी एक स्वतंत्र लिंकही उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अजूनही अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याने ही सुविधा अपुरीच ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने नागरिक जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांत गर्दी करत आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. तसेच, पैसे काढण्यासाठीही रात्री उशिरापर्यंतही एटीएम केंद्रांच्या बाहेर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. अशावेळी आपल्या जवळपास असणाऱ्या विविध बॅंकांची एटीएम केंद्रे नक्की कुठे आहेत, हे सांगणारी "गूगल'ची नवी सुविधा अनेकांना उपयोगी पडत आहे. विशेषतः ज्या भागाची माहिती आपणाला नाही, अशा भागात एटीएम केंद्र नेमके कुठे आहे, हे शोधण्यासाठी या सुविधेचा उपयोग होताना दिसत आहे. 

अशी आहे ही सुविधा 

"फाइंड ऍन एटीएम निअर यू' या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर लगेच आपल्या आसपासच्या एटीएमची यादी तेथील छायाचित्रासह उघडली जाते. यासोबतच एटीएमचा संपूर्ण पत्ता, फोन क्रमांक आणि कामकाजाची वेळही त्यात पाहता येते. विशेष म्हणजे, ही सुविधा "गूगल मॅप'ला जोडली असल्यामुळे ती कम्प्युटर तसेच मोबाईल युजर्सनाही वापरता येते आणि आपली जागा जसजशी बदलत जाईल, तसतशी एटीएमची यादीही अपडेट होताना पाहायला मिळते. 

Web Title: Google Search near ATM