Government Website : केंद्र सरकारकडून सरकारी वेबसाईट धोक्‍यात आल्याचे सांगणे धक्कादायक; गोपाळ तिवारी

केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या वेबसाईटस या धोक्‍यात आले असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले
Gopal Tiwari statement It is shocking to say Government website in danger central government
Gopal Tiwari statement It is shocking to say Government website in danger central government sakal
Updated on

पुणे : केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या वेबसाईटस या धोक्‍यात आले असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. खुद्द सरकारनेच असे सांगणे हे धक्कादायक व नामुष्कीचे आहे. याऊलट सरकारने संबंधित सरकारी वेबसाईट हॅक करण्याची धमकी देणाऱ्या "इंडोनेशिया हॅक्‍टीव्हीस्ट'वर काय कारलाई केली, हे जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या अधिकृत व अतिमहत्वाच्या वेबसाईट स्लोडाऊन व्हाव्यात, सरकारी सेवांचा लाभ कोणालाही घेता येऊ नये, या हेतूने इंडोनेशियातील हॅक्‍टीव्हीस्टकडून धमकी दिली होती. गुजरात सरकारची वेबसाईटही त्यांनी हॅक करण्याचा प्रकार केला. हा प्रकार धक्कादायक व संशयाग्रस्त आहे, भारतावर अशा पद्धतीची नामुष्की पहिल्यांदाच आली आहे.

लोकशाहीमध्ये सरकार बदलत असते, मात्र विविध सरकारांच्या काळातील योजनांचे सत्य आणि तथ्य वेबसाईटवर अबाधित असणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने केंद्र सरकारने देशातील जनतेस या सरकारी वेबसाईटच्या सुरक्षेविषयी आश्‍वासित करुन केंद्र व राज्य सरकारांनी आपले उत्तरदायित्व पार पाडावे, अशी मागणी गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com