पुण्यासाठी महत्त्वाचे असलेले निर्णय हे सरकार रद्द करतेय : जगदीश मुळीक

The government is canceling decision that is important for Pune said Jagdish Mulik
The government is canceling decision that is important for Pune said Jagdish Mulik

पुणे : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय असून, ते पुण्याच्या विकासाला आडकाठी निर्माण करत आहे. प्रकल्पांना स्थगिती दिली जात आहे; तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, शेतकऱ्यांचीही फसवणूक केली आहे. याविरोधात हल्लाबोल करण्यासाठी मंगळवारी (ता. 25) सकाळी दहा वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

मुळीक म्हणाले, की ''भाजपने रखडलेला 'एचसीएमटीआर' प्रकल्प मार्गी लावला. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असताना तो रद्द करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. मुंबई ते पुणे हायपरलूप प्रकल्पही रद्द केला. पुण्यासाठी महत्त्वाचे असलेले निर्णय हे सरकार रद्द करत आहे; पण त्यांचे प्रयत्न भाजप यशस्वी होऊ देणार नाही. तीन महिन्यांत शेतकऱ्यांची फसवणूक झाली. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. या सरकारला जाग यावी, यासाठी राज्यात मंगळवारी 400 ठिकाणी आंदोलन केले जाईल. पुण्यात बालगंधर्व चौकात आणि हडपसरच्या गाडीतळ चौकात आंदोलन होईल.''

कुत्रं पाळणं ठरतंय स्टेटस सिम्बॉल

पक्षश्रेष्ठी घेतील काकडेंचा निर्णय
खासदार संजय काकडे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीविषयी जगदीश मुळीक म्हणाले, की, ''मला संजय काकडे यांनी निवडणुकीत मदत केली; पण त्यांना उमेदवारी देण्याचा विषय हा मोठा आहे. तो स्थानिक पातळीवर होणारा नाही. तो निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. दरम्यान, सॅलीसबरी पॉर्क येथील उड्डाण पुलाच्या प्रश्‍नावर अधिकारी, व्यापाऱ्यांशीही चर्चा करू, असे असेही मुळीक यांनी सांगितले.

खडीमशिन चौक-मंतरवाडी रस्ता धोकादायक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com