दिव्यांगांना रांगेत थांबावं लागतंय तासन् तास; लॉकडाउनमध्ये हरपली संवेदना

दिव्यांगांना रांगेत थांबावं लागतंय तासन् तास; लॉकडाउनमध्ये हरपली संवेदना

पिंपरी : कोरोना संसर्ग परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक भाजीपाला, किराणा, मटण-चिकन दुकानांच्या बाहेर रांगा लावत आहेत. खेदाची बाब म्हणजे अंध-अपंग व्यक्तींना देखील रांगांमध्ये वाट पाहावी लागत आहे. या बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जात नाही. त्यांच्या अधिकारांचे हनन होत असल्याची बाब समोर आली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे दिव्यांग व्यक्तींना भाजीपाला खरेदी, पेट्रोल भरणे, दवाखाना व मेडीकलमध्ये आदी विविध कामांसाठी बाहेर पडावे लागत आहे. मात्र, गर्दीमुळे कठीण परिस्थितींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच जणांकडे दुचाकी नाहीत. काहीजणांना रिक्षा करणे परवडत नाही. बरेच जण कुबड्यांचाच वापर करतात. त्यात बस सेवा देखील बंद आहे. त्यानंतरही जीव धोक्‍यात घालून प्रत्येक ठिकाणी गर्दीचा सामना करावा लागत आहे. काही अपंग बांधव काठ्या घेऊन उभे असूनही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे गर्दीत संवेदना हरपल्याची वस्तुस्थिती अंध-अपंग बांधवांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या लढ्यात 'फर्ग्युसन'ही झालं सहभागी; होस्टेलमध्ये उभारणार कोविड केअर सेंटर!

कायदा केवळ कागदावरच
''केंद्र शासनाने अपंग अधिनियम 2016 मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना धोका, सशस्त्र संघर्ष व आपत्तीच्या ठिकाणी समान संरक्षण व सुरक्षितता मिळेल असे नमूद केले आहे. मात्र, याचा विसर पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेला पडला आहे. वाढत्या गर्दीमध्ये अपंगाची होणारी परवड बंद करावी. जनजागृतीसाठी महापालिकेने गर्दीच्या ठिकाणी पोस्टर लावावीत, ''अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''बऱ्याच अपंग बांधवांची भाजीपाला व इतर किरकोळ विक्रीची दुकाने आहेत. गर्दीमुळे तेथे देखील व्यवसाय विक्रीसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे कायदा केवळ कागदावरच राहिला आहे. दिव्यांगाना सर्व ठिकाणी सुलभ प्रवेश मिळावा यासाठी ठोस पावले उचलावीत.''
- महेश वाघ, दिव्यांग, दापोडी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com