esakal | नागरिकांनो, गांभीर्य ओळखा ! वेळेतच खरेदी करा

बोलून बातमी शोधा

market
नागरिकांनो, गांभीर्य ओळखा ! वेळेतच खरेदी करा
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

वाघोली : राज्य कडक लॉकडाउनच्या दिशेने जात आहे. राज्य शासनाने नियमावलीत बदल करून अत्यावश्यक सकाळी 7 ते 11 केल्या आहेत. दरम्यान किराणा, डेअरी 11 वाजता बंद झाले मात्र, भाजीपाला बाजार 11 नंतरही सुरू राहिल्याने लोणीकंद पोलिसांनी तो जाऊन बंद केला. शासन वेळ ठरवून देत असतानाही नागरिक बंद होण्याच्या आधी अर्धा तास भाजीपाला व अन्य वस्तू खरेदीसाठी बाहेर पडतात. यामुळेच वेळ पाळला जात नाही.

कडक नियम लावूनही गर्दी होत असल्याने राज्य सरकारने सोमवारी रात्री नवी नियमावली जाहीर केली. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानही सकाळी 7 ते 11 सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. आज पाहिल्यादिवशी किराणा व डेअरी 11 वाजता बंद झाली. मात्र भाजी बाजार 11 नंतरही ग्राहक असल्याने सुरू होता. यामुळे पोलिसांना तो बंद करण्याची वेळ आली. खरं तर शासन वेळा जाहीर करतात. मात्र नागरिक बंद वेळेच्या आधी अर्धातास खरेदी साठी बाहेर पडत असल्याचे दिसून येते. यामुळे या वेळेत गर्दी होते. खरेदी साठी कुटुंबाच्या कुटुंब बाहेर पडलेले दिसतात. नागरिकांची ही एनवेळची खरेदी नियमावली पायदळी तुडविण्यासाठी कारणीभूत ठरते. कोरोनाचा एवढा हाहाकार सुरू असतानाही नागरिकांना गांभीर्य दिसून येत नाही.

हेही वाचा: बारामतीत कोराेना रुग्णसंख्येने गाठला आज चारशेचा टप्पा

वाघोलीत सर्वच परिसरात भाजी विक्रेते बसतात. नागरिकांनी त्यांच्या परिसरात खरेदी केल्यास भाजी मंडईत गर्दी होणार नाही. मात्र या मंडईत स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने नागरिक गर्दी करतात. या गर्दीने आपला जीव धोक्यात जाऊ शकते याचे त्यांना भान नसते. किरणाबाबत तीच स्थिती आहे. किरणासाठीही अनेक जण गावभर फिरताना दिसतात. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्यांचीही कमी नाही. नागरिक ऐकत नसल्याने पोलीस ही ऍक्शन मोड मध्ये येऊ लागले आहेत. आता तरी गांभीर्य ओळखा आणि घरी बसा अशी विनवणी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

हेही वाचा: सिंहगड रस्त्यावर कचऱ्याला लागलेल्या आगीत तिघेजण होरपळले; घंटागाडीही जळून खाक