Energy Infrastructure Rationing: Government Imposes 200-Litre Cap on Daily Diesel Sales
Sakal
पारगाव : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेली पेट्रोलियम पुरवठा साखळी आणि स्थानिक पातळीवर वाढणारी डिझेलची साठेबाजी थांबवण्यासाठी केंद्रसरकारने कडक पावले उचलली असून नव्या आदेशानुसार पेट्रोलपंपावरून एका वाहनाला एका दिवसात २०० लिटर पेक्षा जास्त डीझेल विकता येणार नाही हे डीझेल केवळ वाहनाच्या थेट इंधन टाकीत किंवा मान्यताप्राप्त कंटेनरमध्येच भरून दिले जाईल खरेदी केलेल्या डीझेलची ग्राहकाला पुनर्विक्री करण्यास पूर्णपणे बंदी असल्याने या नवीन निर्बंधामुळे ग्रामीण भागात खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची तसेच रुग्णालयांची गैरसोय होणार आहे त्यामुळे शेतकरी, रुग्णालय तसेच अत्यावश्यक सेवेतील संस्थाना या नियमातून सुट द्यावी अशी मागणी होत आहे.