कोरोनाला रोखण्यासाठी नवे जिल्हाधिकारी म्हणतात...

जनार्दन दांडगे
Tuesday, 15 September 2020

-कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रनेबरोबरच, लोकसहभागही गरजेचा. 

-शासकिय यंत्रणेबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंमसेवी संस्था व नागरीकांच्या सहभागाने कोरोनाला दूर ठेवूया.

-जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आवाहन.

 

लोणी काळभोर (पुणे) : कोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागही फार गरजेचा आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजनेअंतर्गत घऱोघऱी जाऊऩ शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हातील प्रत्येक नागरीकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाला कुटुंबापासून, गल्लीपासून, गावापासून कायमस्वरुपी दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंमसेवी संस्था व नागरीकांनी स्वंयणस्फुर्तीने पुढे येऊन, कोरोना विरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजनेअंतर्गत जिल्हातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील नागरीकांची तपासनी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी येथे मंगळवारी (ता. 15) सकाळी जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून  करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना डॉ. देशमुख यांनी वरील आवाहन केले. 

यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी संदीप कोईनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अशोक नांदापुरकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेलीचे पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खऱात, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ, उपसरपंच नाना कुंजीर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनाला दुर ठेवण्यासाठी मागील काही महिण्यांपासून शासकीय यंत्रणा रात्रंदिवस काम करत असली तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पुर्णपणे यश आलेले नाही. हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुटुंबातील, गावातील प्रत्येक संशयित नागरीकांची तपासणी  होणे गरजेचे असल्यानेच, शासनाने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजनेअंतर्गत घऱोघऱी जाऊऩ शासकीय यंत्रणेमार्फत प्रत्येक नागरीकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी, ही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही फार गरजेचा आहे. यामुळे गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, स्वयंमसेवी संस्था व नागरीकांनी स्वंयणस्फुर्तीने पुढे येऊन या तपासणीसाठी सहकार्य करण्याची गरज आहे. तपासनीसाठी नागरीक पुढे आले तरच, ही योजना यशस्वी होणार आहे.''

कोरोना दूर ठेवण्यासाठी लढणाऱ्यांचे आभार : अशोक पवार

यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, ''मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजनेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची, गावातील प्रत्येक नागरीकांची तपासणी होणार आहे. यामुळे गावातील संशयित कोरोनाबाधित नागरीकांची माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे. या तपासनी दरम्यान आढळलेल्या संशयित रुग्णांची तात्काळ कोविडची तपासणी करण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे. कोरोनाचा पहि्ला रुग्ण आढळून आल्यापासून, कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स यांच्यासह पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, महसुल विभागाचे कर्मचारी असे विविध घटक जीव धोक्यात घालून, कोरोनाला रोखण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. '' 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government machinery, public participation is also needed to keep Corona away says dr. rajesh deshmukh