केंद्र सरकार साखर उद्योगाबाबत संवेदनशील नाही - हर्षवर्धन पाटील

संदेश शहा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भात अद्याप मंत्री समितीची बैठक घेतली नाही. केंद्र- शासन देखील या उद्योगासंदर्भात 
संवेदनशिल नाही. त्यामुळे या उद्योगास आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी शासनाने येत्या हंगामात साखरेचे दर 3400 रूपयांवर स्थिर ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजीसहकार मंत्री तथा कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

बिजवडी ( ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन माजी मंत्री पाटील, कारखाना उपाध्यक्षा पद्माताई भोसले, संचालक राहूल जाधव व भारती जाधव यांच्या हस्ते बुधवारी १९ सप्टेंबर रोजी झाले. यावेळी मयूरसिंह पाटील, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, अतुल व्यवहारे, हनुमंत जाधव, राजेंद्र चोरमले, वामन सरडे, सुभाष बोंगाणे उपस्थित होते. 

पाटील पुढे म्हणाले, केंद्रशासनाने शेतक-यांना आर्थिक न्याय द्यावा म्हणून साखर निर्यात अनुदान 150 रुपये करावे, 50 लाख टन साखर फेब्रुवारी अखेर निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, एफआरपी 200 रूपयाने वाढवल्याने साखर विक्रीची किमान किंमत 3400 करावी, उद्योगासाठी शासनाने 15 हजार कोटी रूपयांचे सॉफ्ट लोन उपलब्ध करुन द्यावे, त्यावरील पाच वर्षाच्या आतील व्याज शासनाने फेडावे या मागण्यांसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. येत्या गळीत हंगामासाठी कारखान्याने 15 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून मागील हंगामात शेतकऱ्यांना 2400 रुपये दर देण्याचा शब्द पाळला जाईल, साखर उतारा मिळण्यासाठी तसेच इथेनॉल निर्मितीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. 

प्रास्ताविक कार्यकारी संचालक बाजीराव सुतार तर सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले. आभार संचालक रमेश जाधव यांनी मानले.

Web Title: government not serious about sugar business said harshawardhan patil