सरकारला ताळ्यावर आणू - श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पिंपरी - ‘‘राज्य सरकारकडे कामगार कल्याण निधी पडून आहे. मात्र, कामगारांना सोयीसुविधा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. कामगारांविषयी अनास्था असणाऱ्या नाठाळ भाजप सरकारला महाराष्ट्र मजदूर संघटना ताळ्यावर आणेल,’’ असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला.

पिंपरी - ‘‘राज्य सरकारकडे कामगार कल्याण निधी पडून आहे. मात्र, कामगारांना सोयीसुविधा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. कामगारांविषयी अनास्था असणाऱ्या नाठाळ भाजप सरकारला महाराष्ट्र मजदूर संघटना ताळ्यावर आणेल,’’ असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला.

शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत अवजारे खरेदी करण्यासाठी बांधकाम कामगारांना बारणे यांच्या हस्ते अर्थसाह्य वाटप करण्यात आले. कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये २०० कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपसभापती शरद हुलावळे, सरपंच सागर हुलावळे, सुदाम हुलावळे उपस्थित होते. बारणे म्हणाले, ‘‘बांधकामांना परवानगी देताना नियोजित खर्चाच्या एक टक्का रक्कम ‘सेझ’अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जमा करण्यात येते. सध्या सरकारकडे १० हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. त्याचा लाभ कामगारांना व्हावा.’’ कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, की संघटना केवळ कामगारांसाठी न लढता त्यांच्या कुटुंबीयांनादेखील विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पुस्तक खरेदीसाठी मदत तसेच व्यसनमुक्ती आणि साक्षरता वर्गदेखील चालविले जात आहेत. सर्जेराव कचरे यांनी प्रास्ताविक केले. उज्ज्वला गर्जे यांनी आभार मानले.

Web Title: government shrirang barane