योग, यज्ञाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची जपवणूक : राज्यपाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- योग, यज्ञाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची जपवणूक होत आहे.

पुणे : योग, यज्ञाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची जपवणूक होत आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यति योग फाऊंडेशनच्या वतीने महालक्ष्मी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यारी बोलत होते. यावेळी संस्थापक मोहनानंद यतिजी महाराज, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, संस्थेच्या सचिव उमा देशमुख आदी उपस्थित होते.

आणखी वाचा - आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे असे म्हणत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, संतांच्या कार्यातून संस्कृती जपण्याचे महानकार्य होत असून, त्यामध्ये त्यांचा त्यागही महत्वाचा आहे. महाराष्ट्राने तीर्थक्षेत्र, पर्यटनक्षेत्राच्या माध्यमातून  संस्कृती जपली आहे. देश सर्व बाजूंनी प्रगतीकडे झेपावतो आहे. योग व यज्ञाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता ठेवण्यास मदत होते. तसेच यति योग फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असून, यापुढेही अखंडीत सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यतियोग फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची नितिन गाडगीळ यांनी सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक संस्थापक मोहनानंद यतिजी महाराज यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा लेले यांनी तर आभार आशिष तेसकर यांनी मानले. यावेळी महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Bhagat Singh Koshyari commented about Indian Culture