राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून आणि त्याला ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावरून बरेच वादंग निर्माण झाले होते.

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी शुक्रवारी (ता.12) तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी आणि रविवारी त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

राज्यपाल कोश्‍यारी यांचे येथील राजभवनात आगमन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

डोर्लेवाडीत महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलिस अधिकाऱ्यांनीही केलं रक्तदान​

कोश्‍यारी यांच्या हस्ते 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता वाघोली येथील लेक्‍सिकॉन कॅम्पसमध्ये 'द लेक्‍सिकॉन लिडरशिप ऍवार्ड' प्रदान कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता राजभवन येथे लहान मुलांवरील हिंदी कवितावर आधारित चित्रसंग्रही पुस्तकाचे प्रकाशन होईल. तसेच, 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुषमा नहार संपादित 'गुरु ग्रंथ साहिबमधील संत नामदेव' या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 

कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून आणि त्याला ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावरून बरेच वादंग निर्माण झाले होते. राज्यपालनियुक्‍त विधान परिषदेवरील 12 सदस्यांच्या यादीवर स्वाक्षरी झालेली नाही. अशा विविध कारणांवरून ते सतत चर्चेत असतात. 

एका लग्नाची वेगळी गोष्ट; मुलीचं कन्यादान केल्यावर त्याच मंडपात आईनं घेतले ७ फेरे​

राज्यपाल कोश्‍यारी यांनी 2001 मध्ये उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. 2002 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले. त्यानंतर उत्तराखंड राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्षपदी होते. 2007 मध्ये उत्तराखंड राज्यात भाजपची सत्ता आली. परंतु त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. 2008 ते 2014 या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. त्यानंतर 2014 मध्ये ते नैनिताल लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Bhagat Singh Koshyari is on a three day visit to Pune