esakal | पदवीधरांनी मतदार यादीत नावे नोंदवावी : चंद्रकांतदादा पाटील

बोलून बातमी शोधा

जंगली महाराज रस्ता - भाजपच्यावतीने पदवीधर मतदार नोंदणी आपल्या दारी या अभियानाची सुरवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाली. यावेळी (डावीकडून) राजेश पांडे, जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, गणेश बिडकर, सुनील माने आदी उपस्थित होते.

पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पदवीधरांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

पदवीधरांनी मतदार यादीत नावे नोंदवावी : चंद्रकांतदादा पाटील
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पदवीधरांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर भाजपतर्फे ‘पदवीधर मतदार नोंदणी आपल्या दारी’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. खासदार गिरीश बापट महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, संघटनमंत्री रवी अनासपुरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, अभियानाचे संयोजक शहर चिटणीस सुनिल माने आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार

पाटील म्हणाले, ‘कोरोनामुळे पदवीधर मतदारांना प्रत्यक्ष मतदारयादीत नाव नोंदणी करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तरीही पदवीधर मतदार नोंदणीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मोबाईल व्हॅन घरोघरी जाऊन नोंदणी करणार आहे. ’’ नावनोंदणीसाठी ९१५८४८३८१३ हा व्हॉट्‌सॲप क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil