संशोधनासाठी तरतूद वाढवावी - गोपालकृष्णन

पाषाण - आयसर संस्थेच्या पदवीप्रदान सोहळ्यात पंकज भागवत या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्याच्या आईने पेढा भरवून त्‍याचे कौतुक केले.
पाषाण - आयसर संस्थेच्या पदवीप्रदान सोहळ्यात पंकज भागवत या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्याच्या आईने पेढा भरवून त्‍याचे कौतुक केले.

पुणे - ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाला चालना देण्यासाठी त्यावर अधिक खर्च होणे गरजेचे आहे. देशाच्या अर्थसंकल्पात संशोधन आणि विकासासाठी असलेल्या खर्चाच्या तरतुदीत वाढ होणे ही काळाची गरज आहे,’’ असे मत ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक एस. क्रिस गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचा (आयसर) आठवा पदवी प्रदान सोहळा शनिवारी झाला. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आयसरचे संचालक प्रा. जयंत उदगावकर उपस्थित होते. गोपालकृष्णन म्हणाले, ‘‘अमेरिकेसारख्या विकसित देशात सरकारकडून संशोधनावर भर दिला जात आहे. तसेच संशोधनासाठी खासगी निधीही मोठ्या प्रमाणात दिला जातो. भारतातही औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) योजनेंतर्गत उपलब्ध होणारा निधी सामाजिक कामाबरोबरच संशोधनासाठी वापरल्यास भविष्य अधिक चांगल्याप्रकारे आकाराला येऊ शकते.’’

संशोधनासाठी जागतिक पातळीवरील संशोधकांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे. संशोधन हे विविधांगी असायला हवे, तसेच ते बहुउद्देशीय असले पाहिजे. १९९० ते २०१५ या कालावधीत जागतिक पातळीवर सादर झालेले बहुतांश संशोधन हे विविध देशातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन केलेले आहेत. शास्त्रज्ञांनी संशोधन आणि त्याचा परिणाम नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.  तसेच, देशात होणाऱ्या ब्रेन रिसर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशनल इंटेलिजन्स) आणि मशिन लर्निंग संशोधनाबाबत प्रचंड उत्साह असल्याचेही  ते म्हणाले.

देशातील नामांकित संस्थांपैकी एक असणाऱ्या ‘आयसर’मध्ये शिक्षणाची संधी मिळाली. आता संस्थेमधील शिक्षणाचा अनुभव घेऊन पीएच.डी. करण्यासाठी मी कॅनडामध्ये जाणार आहे. आयुष्यात काहीही अशक्‍य नाही, त्यासाठी सतत प्रयत्न चालू ठेवणे महत्त्वाचे आहे.
- पंकज भागवत, सुवर्णपदक विजेता विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com