स्वस्त धान्य दुकान पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील चांडोह गावात स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाला करण्यात आली होती. त्यातून धान्य दुकानदारावर कारवाई करून दुकान बंद करण्यात आले होते. अखेर या महिन्यापासून हे दुकान सुरू करण्यात आले. नियमीत धान्य मिळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील चांडोह गावात स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाला करण्यात आली होती. त्यातून धान्य दुकानदारावर कारवाई करून दुकान बंद करण्यात आले होते. अखेर या महिन्यापासून हे दुकान सुरू करण्यात आले. नियमीत धान्य मिळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नियमीत धान्य मिळत नाही, अधिक पैसे तर धान्य कमी अशी अवस्था होती, त्यातून शिधापत्रीकेवर खाडाखोड या बाबतची तक्रार दक्षता समितीचे अध्यक्ष संजय कोंडे, पोपट भुजबळ, दत्तात्रेय भाकरे यांनी अर्ज करून केली होती. या बाबत शिरूर महसूल विभागाच्या पुरवठा विभाग व जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर नागरीकांमध्ये व स्वस्त धान्य दुकानाची चौकशी व तप्तर तपासणी करण्यात आली. या बाबत संबधीत अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना अहवाल देणार होते. अनेक वेळा या बाबत शिरूर पुरवठा विभागाकडे चौकशी केली असता माहिती मिळाली नाही. अखेर चांडोह ( ता. शिरूर ) येथील स्वस्त धान्य दुकान फाकटे ( ता. शिरूर ) येथील स्वस्त धान्य दुकानदार वसंत राळे यांना देण्यात आले. ग्रामस्थांनी गावात या दुकानासाठी खोली उपलब्ध केल्याने स्वस्त धान्य नागरीकांना मिळू लागले आहे. वेळेत धान्य व रितसर धान्य मिळू लागल्याने नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

दुकान सुरू झाले असले तरी देखील शिधापत्रीकेवर केलेल्या खाडोखो़ड याबाबत नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबधीत अघिकाऱ्यांने या बाबत कोणतीच कारवाई का केली नाही. शिधापत्रीका खाडोखोड याबाबत गुन्हा दाखल केला नसल्याने संबधीत अधिकाऱ्याची चौकशी व्हावी. अन्यथा जिल्हा पुरवठा कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याची चर्चा गावात होती. 

गावात 282 पात्र लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानात येणारे धान्याचे वाटप सुरू केले आहे. रितसर येथील नागरीकांना शिधापत्रीका दुरूस्त करण्यासाठी मदत करणार असल्याचे दुकानदार वंसत राळे यांनी सांगितले. 

सकाळचा पाठपूरावा...
शिधापत्रीका मार्फत येणारे धान्य वेळेत मिळत नाही, रितसर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी व शिधापत्रीकेत खाडोखोड याबाबत नागरीकांनी सकाळ कडे तक्रारी दिल्या आहेत. या बाबत अनेक वेळा दैनिक सकाळ मधून वारंवार वार्तांकन करून आवाज उठविण्याचे काम केले होते. योग्य प्रकारे धान्य मिळू लागल्याने नागरीक सकाळचे अभीनंदन करू लागले आहेत. 
 

Web Title: grain shop started again in the shirur