Gram Panchyat Election : पिंपळवंडी गावच्या सरपंचपदी मेघा काकडे;

सरपंच मेघा काकडे व विजयी सर्व सदस्यांनी ग्रामदैवत मळगंगा मातेचे दर्शन घेतले व मतदारांचे आभार मानले.
junner
junner sakal

पिंपळवंडी - पिंपळवंडी(ता.जुन्नर) गावच्या सरपंचपदी आई मळगंगा ग्रामविकास पॅनेलच्या मेघा राजेश काकडे या विजयी झाल्या असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी व्ही. आर.धोंडगे यांनी दिली.

मेघा काकडे यांनी श्री मळगंगा माता ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार सुप्रिया लेंडे व करिष्मा कसबे यांचा पराभव केला.

माजी आमदार शरद सोनवणे,जिल्हा परिषदेचे माजी उपजिल्हाध्यक्ष शरद लेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांचे हे गाव असुन पिंपळवंडी गावच्या निवडणुकीकडे जुन्नर तालुक्याचे लक्ष लागले होते. जनतेचा जनादेश हा आई मळगंगा ग्रामविकास पॅनेलच्या बाजुने लागला असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले.

या पॅनलची प्रमुख जबाबदारी शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काकडे,माजी सरपंच शिवाजी काकडे संचालक विवेक काकडे,माजी सभापती संगीता वाघ यांनी माजी आमदार शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सरपंच मेघा काकडे व विजयी सर्व सदस्यांनी ग्रामदैवत मळगंगा मातेचे दर्शन घेतले व मतदारांचे आभार मानले.

सदस्यपदाच्या १७ जागांपैकी २ जागा या बिनविरोध झाल्याने १५ जागांसाठी निवडणुक लागली होती.

आई मळगंगा ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदा सह १० जागा,रघुनाथ लेंडे यांच्या श्री मळगंगा माता ग्रामविकास पॅनलच्या २ जागा व अपक्ष उमेदवारांच्या ३ जागा निवडुन आल्या.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.

सरपंच-मेघा राजेंद्र काकडे

junner
Gram Panchayat Election Results: बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

वॉर्ड क्रमांक १ मधून निवडून आलेले उमेदवार-

गणेश भगवान फुलसुंदर,सचिन दत्तात्रय ठाणेकर,स्वाती राजेंद्र काकडे,

वॉर्ड क्रमांक २ मधून निवडून आलेले उमेदवार-

संदीप गुलाबराव लेंडे,कल्पना परशुराम कोकाटे, स्नेहा कार्तिक शेटे,

वॉर्ड क्रमांक ३ मधून निवडून आलेले उमेदवार-

नितेश विजय काकडे,नूतन रंजन तोतरे,

वॉर्ड क्रमांक ४ मधून निवडून आलेले उमेदवार-

निखिल बबन दांगट,मयूर सुरेश पवार,प्रियंका प्रशांत वाळुंज,

वॉर्ड क्रमांक ५ मधून निवडून आलेले उमेदवार- भाऊसाहेब बळीराम सोनवणे.पूजा निलेश बाम्हणे व तृप्ती रामदास वायकर या बिनविरोध निवडुन आल्या होत्या.

वॉर्ड क्रमांक ६ मधून निवडून आलेले उमेदवार-

सतीश बाळकृष्ण काचळे,वैशाली जयवंत कसबे, तेजश्री मंगेश शिंदे.

junner
Gram Panchayat Election Results: भाजप पाठोपाठ अजित पवार गटाची मुसंडी, महायुतीचं वर्चस्व तर आघाडीचा धुराळा; आत्तापर्यंत कोणाला किती ग्रामपंचायती मिळाल्या

आई मळगंगा ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांवर सर्व मतदारांनी विश्वास दाखवला.पिंपळवंडी गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्व मतदार बंधु भगिनींचे आभार मानते.तसेच मी जी आश्वासने दिली आहेत ती सर्व पुर्ण करेल व गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी कार्य करेल.

सरपंच - मेघा काकडे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com