खडकीत शासकीय जागेत गाव पुढाऱ्यांचे अतिक्रमण; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Gram Panchayat Neglect  Encroachment on in khadki government space
Gram Panchayat Neglect Encroachment on in khadki government space

कुरकुंभ: खडकी (ता. दौंड) येथील शासकीय गायरान, गावठाण व शाळेच्या जागेत गावातील धनदांडगे, गाव पुढाऱ्यांनी अतिक्रमण करून मोक्याच्या जागा लाटल्या आहेत. एकमेकांचे अतिक्रमण काढण्याच्या हेवेदाव्यातून खासगी जागेतून जाणारे रस्ते बंद करण्यासारखे प्रकार घडल्याने सर्वसामान्य गरिबांचे हाल होत आहेत. त्याकडे मात्र प्रशासन, ग्रामपंचायत व गाव पुढारी दुर्लक्ष करीत आहेत.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकी येथे पुणे - सोलापूर महामार्गालगत मोठयाप्रमाणात शासकीय गायरान क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक धनदांडगे व गाव पुढाऱ्यांनी महत्वाच्या जागांवर अतिक्रमण करून मोठया इमारती थाटल्या आहेत. त्यामधून मोठयाप्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळतं असल्याने उर्वरित गायरान,गावठाण व शाळेच्या जागांवरतीही काही धनदांडगे, गाव पुढाऱ्यांनी नव्याने अतिक्रमण केले आहे. ही अतिक्रमणे काढण्याच्या मागणीवरून गावातील वातावरण चिघळले आहे. राजकीय हेवेदाव्यामुळे पहिले यांचे अतिक्रमण काढा मगं आमचं अतिक्रमण काढा असे ग्रामपंचायत व प्रशासनाला सांगितले जात आहे. त्यामध्ये तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढत आहे. अतिक्रमणे काढत नसल्याने काही ग्रामस्थांनी त्यांच्या खासगी जागेतून गावात जाणारे महत्वाचे रस्ते बंद केल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तरी याकडे प्रशासन व ग्रामपंचायत कानाडोळा करीत आहे. अतिक्रमणे काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने नोटीस बजावूनही ठोस कारवाई होत नाही. अतिक्रमणाबाबत  भेदभाव न करता शासकीय जागेतील अतिक्रमणे काढून टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चंद्रकांत देवकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या असून त्यासंदर्भात तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने शासनाने प्रशासक नेमला. मात्र प्रशासकाची बदली झाल्याने नवीन प्रशासनाची नेमणूक झाल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती देवकांबळे यांनी दिली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com