Gram Panchyat Results : जाधववाडी ग्रामपंचायत ५- १ ने धुव्वा

श्रीदत्त तुकाई माता हनुमान ग्रामविकास पॅनलने श्रीदत्त प्रभू तुकाईमाता जय हनुमान ग्रामविकास आघाडी पॅनलचा ५-१ असा पराभव करत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले.
jadhavwadi
jadhavwadisakal

निरगुडसर - जाधववाडी (ता.आंबेगाव)येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्रीदत्त तुकाई माता हनुमान ग्रामविकास पॅनलच्या अर्चना विशाल जाधव यांनी श्रीदत्त प्रभू तुकाईमाता जय हनुमान ग्रामविकास आघाडी पॅनलचा राजश्री मंगेश जाधव यांचा पराभव केला तसेच श्रीदत्त तुकाई माता हनुमान ग्रामविकास पॅनलने श्रीदत्त प्रभू तुकाईमाता जय हनुमान ग्रामविकास आघाडी पॅनलचा ५-१ असा पराभव करत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले.

जाधववाडी ता.आंबेगाव येथील ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंचपदासाठी राजश्री मंगेश जाधव व अर्चना विशाल जाधव यांचा झालेल्या सरळ लढतीमध्ये अर्चना विशाल जाधव यांचा विजय झाला तसेच जाधववाडी ग्रामपंचायतमध्ये एकूण सात सदस्य आहेत,त्यामध्ये श्रीदत्त तुकाई माता हनुमान ग्रामविकास पॅनलच्या दिपाली प्रवीण जाधव यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित सहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते,

त्यामध्ये श्रीदत्त तुकाई माता हनुमान ग्रामविकास पॅनलने श्रीदत्त प्रभू तुकाईमाता जय हनुमान ग्रामविकास आघाडी पॅनलचा ५-१ असा पराभव करत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. श्रीदत्त तुकाई माता हनुमान ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार आणि कंसात मिळालेली मते:सरपंच अर्चना जाधव(४६०)

संपत रघुनाथ जाधव(२०७),मोहिनी संतोष जाधव(१८२), प्राजक्ता महेश जाधव(१७८),सौरभ किशोर जाधव(१६३),शैलेश शरद जाधव(१०४) श्रीदत्त प्रभू तुकाईमाता जय हनुमान ग्रामविकास आघाडी पॅनलचा ज्योती गणेश भोर(१०८) हे उमेदवार विजयी झाले आहे.सरपंच व विजयी उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.फोटो खाली ओळ: जाधववाडी (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीवर श्रीदत्त तुकाई माता हनुमान ग्रामविकास पॅनलने विजयी जल्लोष केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com