Grampanchyat Election Result : आंबेगाव तालुक्यात 24 ग्रामपंचायतीवर वळसे पाटील; आठ ग्रामपंचायतीवर आढळराव पाटील यांचे वर्चस्व

शिवसेना पक्षाकडे निरगुडसर, चांडोली खुर्द, मांदळेवाडी, जाधववाडी, पारगाव शिंगवे, बोरघर, लोणी,
pune
punesakal

मंचर - आंबेगाव तालुक्यात एकूण ३१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी (ता ६) घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे २२ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले.

त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने २४ ग्रामपंचायती व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदेगटाने आठ ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केल्याचा दावा केला आहे. याबाबत अनुक्रमे

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, शिवसेना पक्षाचे आंबेगाव तालुका प्रमुख संतोष डोके व उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावे केले आहेत.

महाळुंगे तर्फे घोडा, कानसे, सुपेधर, तळेकरवाडी, पहाडदरा, कोलतावडे, वाळूंजनगर, जारकरवाडी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) व टाव्हरेवाडी (शिवसेना शिंदेगट) या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच निवडणूक निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये अवसरी बुद्रुक, तांबडेमळा, पिंपरगणे, डिंभे बुद्रुक, चपटेवाडी, फुलवडे, कुशिरे बुद्रुक, जाधववाडी, ठाकरवाडी, गोहे बुद्रुक, पाटण, फलोदे, चास, टाकेवाडी, नांदूर, मांदळेवाडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे.

असे हिंगे यांनी सांगितले. नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कार्याध्यक्ष निलेश थोरात, रमेश खिलारी, संतोष भोर, सुहास बाणखेले, अनिल वाळुंज, भगवान वाघ, दिनेश खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

pune
Gram Panchayat Election Results: बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

शिवसेना पक्षाकडे निरगुडसर, चांडोली खुर्द, मांदळेवाडी, जाधववाडी, पारगाव शिंगवे, बोरघर, लोणी, चास या ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करण्यात आला. मांदळेवाडी, चास व जाधववाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट, शिंदे शिवसेना गट व शरद पवार गटाने ही दावा केला आहे. दरम्यान लांडेवाडी येथे शिवसेना शिंदेगटाच्या विजयी उमेदवाराचा सत्कार संतोष डोके, सुनिल बाणखेले यांच्या हस्ते करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com