सरपंचपदासाठी 535 अर्ज वैध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

शिर्सुफळ - जिल्ह्यातील जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या एकूण ९० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी ५३९, तर सदस्यपदासाठी २४९३ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये झालेल्या छाननीअंती सरपंचपदासाठी ५३५ व सदस्य पदासाठी २३६५ अर्ज वैध ठरले आहेत. सात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये खेड व भोर तालुक्‍यांतील ग्रामपंचायतीची जागा वगळता उर्वरित वेल्हे तालुक्‍यातील दोन, भोर जुन्नर व आंबेगावमधील एका जागेच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी या वेळीही एकही अर्ज दाखल झाला नाही.

यामुळे या वेळेही या जागा रिक्तच राहणार आहेत. दरम्यान बुधवारी (ता. १६) अर्ज माघारीचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकींच्या लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्य पदासाठी अर्ज छाननीनंतर सरपंचपदासाठी ५३५ उमेदवारांनी व सदस्य पदासाठी २३४४ उमेदवारांनी २३६५ अर्ज वैध ठरले आहेत. पोटनिवडणुकांमध्ये सात गावांच्या सरपंचपदापैकी फक्त दोनच गावात प्रत्येकी एकच अर्ज वैध झाले आहेत. यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. पाच गावांतील सरपंचपद पुन्हा रिक्तच राहणार आहे. सदस्य पदासाठी २५८ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी फक्त १४२ अर्जच दाखल झाले आहेत. यामुळे सदस्य पदाच्या अनेक जागा पुन्हा रिक्तच राहणार आहेत.

Web Title: grampanchyat election sarpanch form politics