esakal | पावसात गळणारी ती झोपडी...एक़ट्या राहणाऱ्या आजी..अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

bade.jpg

बडे यांचेच हातावर पोट होते, पोलिसांनी दिलेला किराणा माल त्यांना किमान महीनाभर पुरला असता. परंतु दुसऱ्याकडून मिळालेल्या मदतीचा उपयोग स्वत:साठी न करता बडे भुकेल्या वाटसरूंसाठी करीत होत्या. 

पावसात गळणारी ती झोपडी...एक़ट्या राहणाऱ्या आजी..अन्...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : रस्त्याच्याकडेला असलेल्या एका झोपडीत ती महिला एकटीच राहते. तिचे हक्काचे असे इथे कोणीच नाही. त्या दिवशी पाऊस आला, तेव्हा पोलिसांनी तिची विचारपुस करुन तिला किराणा दिला. आता काही दिवसांचा तिचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता, पण तिने स्वत:च्या पोटापेक्षा गावी पायी निघालेल्या मजुरांना, त्यांच्या कुटुंबाला मायेचे दोन घास अन् पाणी देऊन त्यांची भुक भागवित माणुसकीचे दर्शन घडविले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलिस कर्मचारी प्रशांत नरसाळे आपल्या सहकाऱ्यासह 15 मे रोजी सोलापूर रॊड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आकाश लॉन्स जवळील रस्त्याच्याकडेला एका छोट्या पत्र्याच्या झोपडीत लक्ष्मी बडे या 55 वर्षीय महिला एकटयाच राहात असल्याचे निदर्शनास आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, अगोदरच्या रात्री भरपूर पाऊस झाल्याने लोणारे, नरसाळे बडे यांची विचारपुस करण्यास गेले. तेव्हा, बडे यांना यापूर्वी हडपसर पोलिस ठाण्याकडून  किराणा सामान दिले होते. त्या किराणा मालाचा उपयोग करुन बनविलेल्या जेवण बडे या पायी गावी निघालेल्या भुकेल्या वाटसरुंना देत होत्या. त्यांना जेवण, पाणी देऊन त्यांची विचारपुस करीत होत्या.

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?

बडे यांचेच हातावर पोट होते, पोलिसांनी दिलेला किराणा माल त्यांना किमान महीनाभर पुरला असता. परंतु दुसऱ्याकडून मिळालेल्या मदतीचा उपयोग स्वत:साठी न करता बडे भुकेल्या वाटसरूंसाठी करीत होत्या. 

बडे यांच्या या कृतीने सहायक पोलिस निरीक्षक लोणारे यांनाही गहिवरुन आले. त्यांनी बडे यांचे केवळ कौतुकच केले नाही, तर हडपसर पोलिस ठाण्याकडुन त्यांना पुन्हा एकदा किराणा सामान उपलब्ध करून देत त्यांच्या कार्याला सलाम केला.