मोफत गणवेश योजनेच्या अनुदान वाढ 

संतोष आटोळे 
रविवार, 17 जून 2018

शिर्सुफळ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या वर्गात शिकणाऱ्या सर्व मुली व अनुसुचित जाती जमाती व दारिद्रय रेषेखालील मुलांना देण्यात येत असलेली मोफत गणवेश योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्रति गणवेश 200 रुपये प्रमाणे चारशे रुपये अनुदान देण्यात येत होते. यंदापासुन यामध्ये वाढ करुन ती प्रति गणवेश 300 रुपये प्रमाणे दोन गणवेशांसाठी 600 रुपये अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

शिर्सुफळ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या वर्गात शिकणाऱ्या सर्व मुली व अनुसुचित जाती जमाती व दारिद्रय रेषेखालील मुलांना देण्यात येत असलेली मोफत गणवेश योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्रति गणवेश 200 रुपये प्रमाणे चारशे रुपये अनुदान देण्यात येत होते. यंदापासुन यामध्ये वाढ करुन ती प्रति गणवेश 300 रुपये प्रमाणे दोन गणवेशांसाठी 600 रुपये अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

आता शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. यापूर्वी पहिल्या दिवशी गणवेश दिले जायचे यामुळे अनुदानाबाबत लवकर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारमार्फत सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, व शिक्षकांचे शिक्षण अभियान या केंद्र पुरुस्कृत योजनांचे एकत्रिकरण करुन सन 2018-19 पासुन समग्र शिक्षा अभियान या नविन योजनेची सुरवात करण्यात आली आहे. या अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या वर्गात शिकणाऱ्या सर्व मुली व अनुसुचित जाती जमाती व दारिद्रय रेषेखालील मुलांना शासनाकडून पूर्वी दोन गणवेश व गेल्या वर्षीपासुन दोन गणवेशांचे अनुदान बँक खात्यावर वर्ग करुन दिले जाते. 

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे हा यामागील उद्देश आहे. यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. यामधुन मिळणार लाभ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यानुरुप मोफत गणवेश पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी स्वःता आपल्या पाल्यास दोन गणवेश संच खरेदी करून खरेदी केलेल्या पावत्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर शासकिय निधी उपलब्ध झाल्यावर मुख्याध्यापकांच्या मार्फत लाभाची मंजूर रक्कम प्रत्यक्ष बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक असणे अनिवार्य आहे. तर शालेय गणवेशाचा रंग, प्रकार आदी बाबी संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरूनच ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. असे असले तरी अनुदान जमा करण्याबाबतची कार्यवाही लवकर करण्याची मागणी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांमधुन होत आहे.

पाठ्यपुस्तका प्रमाणे सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावा
जिल्हा परिषद शाळेत गोरगरीबांची, वाड्या वस्त्यावरील मुले येत असतात. यामुळे ही योजना चांगलीच आहे. मात्र, ज्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याचप्रमाणे मोफत गणवेशासाठी सुध्दा शाळेत असणाऱ्या सर्व समाजाच्या मुलांसाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देऊन पाठपुरावा करत आहोत. या दोन्ही योजना निश्चितच फलदायी असून यामुळे शाळांतील पटसंख्या वाढण्यास निश्चितच मदत होत आहे. 
- दत्तात्रय वाळुंज (माजी अध्यक्ष पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ)
 

Web Title: Grant of Free Uniform Scheme