तब्बल 9 तासांनंतर पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीला वाचविण्यात यश (व्हिडिओ)

राजकुमार थोरात
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीच्या पुलाजवळून नीरा नदीमध्ये पडलेल्या सोलापूर जिल्हातील अण्णा किसन देवकर (वय ५०, रा. तांबेवाडी, ता. माळशिरस) यांना ९ तासानतंर वाचविण्यात प्रशासनाला यश मिळाले.

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीच्या पुलाजवळून नीरा नदीमध्ये पडलेल्या सोलापूर जिल्हातील अण्णा किसन देवकर (वय ५०, रा. तांबेवाडी, ता. माळशिरस) यांना ९ तासानतंर वाचविण्यात प्रशासनाला यश मिळाले.

आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुरवलीमधील नीरा नदीच्या पुलाजवळून देवकर हे शेतामध्ये पडले होते. ते वाहत चिखली गावाजवळ आले. चिखलीमध्ये नीरा नदीच्या पात्रामध्ये चार एकरचा भूखंड असून यावरती देवकर थांबले होते. चार ही बाजूने पाणी असल्यामुळे देवकर भेदारले होते. चिखलीच्‍या बंधाऱ्यावरुन वाहत जात असताना स्थानिकांना दिसल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर प्रशासनाने तातडीनेे नदीपात्रामध्ये बोट सोडून सायंकाळी सहा वाजता बाहेर काढ्यात यश आले.

कुंभारगाव मधील दत्ता नगरे, अण्णा चव्हाण,सुरेश परे, अक्षय झणझणे यांनी धाडसाने पात्रामध्ये जावून देवकर यांना बाहेर काढले. आमदार दत्तात्रेय भरणे, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार ठाण मांडून बसले होते. नीरा नदी १ लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून नीरा नदीला पूर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great success in rescuing a person trapped in a flood