‘सेकंड होम’चे स्वप्न होणार आता साकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

धकाधकीच्या जीवनशैलीतून निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणारे ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन : २१’ला शनिवारी (ता. २४) प्रारंभ होत आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोथरूड येथील हर्षल हॉलमध्ये रविवारीपर्यंत (ता. २५) ते सुरू राहणार आहे. 

पुणे - धकाधकीच्या जीवनशैलीतून निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणारे ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन : २१’ला शनिवारी (ता. २४) प्रारंभ होत आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोथरूड येथील हर्षल हॉलमध्ये रविवारीपर्यंत (ता. २५) ते सुरू राहणार आहे. 

‘ग्रीन होम एक्‍स्पो’च्या गेल्या २० सीझनच्या माध्यमातून अनेक ग्राहकांचे सेकंड होम, फार्म हाउस, शेतीचे स्वप्न साकार झाले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आता २१व्या सीझनचे आयोजन करण्यात आले असून कोथरूडकरांसाठी ही खास पर्वणी असणार आहे. या प्रदर्शनात भोर, वेल्हा, दापोली, महाबळेश्‍वर, शिरवळ, पारगाव खंडाळा, गणपतीपुळे, पिरंगुट, लोहगाव, हिंजवडी, पानशेत, आंबी व्हॅली आदी लोकेशन्सच्या विविध संधी उपलब्ध असणार आहेत. दोन्ही दिवस सकाळी ११ ते ९ रात्री वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green Home Expo 2019 Sakal Agrowon