निसर्गरम्य ‘सेकंड होम’ची संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

‘ग्रीन होम एक्‍स्पो’ १८ मार्चपासून पुण्यात; स्टॉल बुकिंग सुरू 

पुणे - निसर्गरम्य ठिकाणी सेकंड होम असण्याचे अनेक कुटुंबांचे स्वप्न साकार करणारे ‘ॲग्रोवन ग्रीन होम एक्‍स्पो सीझन १४’ प्रदर्शन पुण्यात १८ व १९ मार्च रोजी होत आहे. यासाठीचे स्टॉल बुकिंग सुरू झाले असून, एक्‍स्पोच्या माध्यमातून सेकंड होम, वीकेंड होम प्लॉट, प्रॉपर्टी गुंतवणूकदारांसह व्यावसायिकांना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचण्याबरोबरच प्रभावी आणि हमखास परतावा मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

‘ग्रीन होम एक्‍स्पो’ची या आधीच्या तेरा प्रदर्शनांना ग्राहक आणि व्यावसायिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला होता. अशाच स्वरुपाचे प्रदर्शन पुन्हा आयोजित करण्याच्या ग्राहक आणि व्यावसायिकांच्या मागणीनुसार आता १४व्या सिझनचे आयोजन करण्यात आले आहे.   

‘सकाळ-ॲग्रोवन’च्या या एक्‍स्पोमध्ये बंगलो प्लॉट्‌स, फार्म हाऊस प्लॉट्‌स, वीकेंड होमसाठीचे प्लॉट्‌स, शेतजमीन विक्रीसाठी असणार आहेत. ग्राहकांना पुणे परिसरातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, लोणावळा, पुरंदर, लोणंद, यवत तसेच कोकणातील दापोली, मंडणगड, अलिबाग, आंजर्ले, गुहागर आदी विविध निसर्गरम्य ठिकाणांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

‘ॲग्रोवन ग्रीन होम एक्‍स्पो सीझन १४’
आयोजन : १८ व १९ मार्च 
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, पुणे. 
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : रूपेश ः ८८८८५२९५००, 
गणेश ः ९५५२५१९९०८ किंवा सुशांत ः ९८५०३०५६५४

Web Title: green home expo