'चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांचे कौतुक व्हावे'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - ""शहराच्या सर्वच क्षेत्रांत मागील काही वर्षांत झपाट्याने बदल झाला आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येचा गांभीर्याने विचार करून नियोजनबद्ध विकास करण्याचे काम नगरसेवकांनी केले आहे. चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांचे कौतुक केले पाहिजे,'' असे मत व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केले.

ग्रीन वर्ल्ड प्रकाशनातर्फे पाच नगरसेवकांना ग्रीन वर्ल्ड कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष गौतम कोतवाल उपस्थित होते. नगरसेवक अशोक हरणावळ, अरविंद शिंदे, विशाल तांबे, मनीषा घाटे, राजेंद्र वागसकर यांना डॉ. शेजवलकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुणेरी पगडी, असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.
डॉ. शेजवलकर म्हणाले, ""महापालिकेत दहा वर्षांहून अधिक काळ नगरसेवक म्हणून काही नगरसेवकांनी उत्तम कामगिरी केली आहे. पुणेकरांच्या हिताचे निर्णय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी घेतले आहेत.''

पक्षाच्या माध्यमातून शहर विकासासाठी लढलेली विविध आंदोलने आणि केलेल्या कार्यावर शिंदे यांनी प्रकाश टाकला. हरणावळ, तांबे, वागसकर, घाटे यांनी आपली संघर्षमय कारकीर्द उलगडली. कोतवाल यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली.

Web Title: green world award