कोरोनामुळे पुण्यातील रेड लाईट एरिया बुधवार पेठेत 'हे' मोठे बदल

कोरोनामुळे पुण्यातील रेड लाईट एरिया बुधवार पेठेत 'हे' मोठे बदल

पुणे : कोरोनामुळे सर्वच व्यवसाय व धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या सर्वच व्यवहार व व्यवसायांवर वाईट परिणाम दिसून येत आहेत. त्याचाच परिणाम रेड लाईट एरियावर देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे. याचीच परिणती म्हणून पुण्यातील बुधवार पेठेतील स्वरूप देखील बदलले आहे. 

लॉकडाउन सुरू होताच बुधवार पेठेला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आणि रेड लाइट एरियात जाणारा प्रत्येक रस्ता ब्लॉक करण्यात आला, येथे पोलिस 24 तास येथे तैनात राहत असतं अनलॉक-1 नंतर येथे नियमांसह देह व्यापार सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली, 5 पॉझिटिव्ह केस आल्यानंतर जुलैमध्ये हे 15 दिवसांसाठी बंद ठेवावे लागले होते.

दरम्यान, एक लाख ऐंशी हजारांपेक्षा जास्त रुग्णांसह पुणे देशातील सर्वात जास्त कोरोना संक्रमितांचे शहर बनले आहे. बाकी जगभरातील लोकांप्रमाणेच महामारीनेही येथे राहणाऱ्यांची लाइफस्टाइल बदलली आहे. शहरातील जुनी रौनक ही जवळपास गायब झाली आहे. देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या रेड लाइट एरिया बुधवार पेठेत मोठा बदल पाहायला मिळत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी येथील प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सेक्स वर्कस महिलांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. लॉकाडाउन झाल्यानंतर चार महिन्यांपर्यंत येथे एकही केस आढळली नाही. पण आता केस समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत 40 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. दिलासादायक म्हणजे आता केवळ 15 पाॅझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. सुदैवाने अद्याप येथे एकाचाही मृत्यू झालेला नाही.

लॉकडाउन सुरू होताच काय केले?
पेठचे प्रभाग अधिकारी सचिन तामखेडे म्हणतात की, 'लॉकडाउन होताच हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. रेड लाइट क्षेत्राकडे जाणारा प्रत्येक रस्ता ब्लॉक करण्यात आला. येथे पोलिसांचे पथक चोवीस तास तैनात होते. येथे होणारा वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यासोबतच घरोघर स्वच्छताही करण्यात आली. येथे राहणाऱ्या बर्‍याच महिला आणि त्यांच्या कुटुंबाची स्क्रिनिंग केली गेली. त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास त्यांना औषधे दिली गेली. येथून घरी जाऊ इच्छित असलेल्या महिलांना घेऊन येण्याची व्यवस्था करण्यात आली.' मार्चपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आतापर्यंत सुरू आहे.

परिसरातील गर्दी पाहता रहिवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पालिकेची टीम या भागात छापा टाकते आणि मास्क न घालता फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करते. परिणामी, गर्दीचे क्षेत्र असूनही आतापर्यंत येथे खूप कमी प्रकरणे आढळली आहेत.

अनलॉक -1 नंतर फक्त येथे नियमांसह देह व्यापार पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, 5 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ते 15 दिवस बंद ठेवावे लागले. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. येथे कार्यरत असलेल्या 'सहेली संघ' च्या तेजस्वी सेवेकारी यांच्या सर्वेक्षणानुसार, बहुतेक सेक्स वर्कर कामावर परतल्या आहेत. एनजीओने पालिकेच्या अधिकार्‍यांसह मिळून एक विशेष एसओपी तयार केला आहे. जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी त्यांना व्हिडिओ-ऑडिओ क्लिपद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुकेने मरण्याची वेळ आली...
तेजस्वी सेवाकारी म्हणतात की, 'जेव्हा या महिलांवर भुकेने मरण्याची वेळ आली तेव्हा यांना संक्रमणापासून बचावासाठी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून 'फोन सेक्स'चा पर्यायही उपलब्ध करण्यात आला. या गूगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पैसे घेत आहेत.' बुधवार पेठेत 7 वर्षांपासून सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या सुप्रिया (नाव बदलेले) म्हणतात, 'अशी परेशानी आम्ही नोटबंदीच्या वेळीही पाहिली नव्हती. आमचा परिसरही सील होता. आम्ही घरात बंद होतो. बाहेर सामना घेण्यासाठीही जाऊ दिले जात नव्हते. कमाईचे संपूर्ण सोर्स बंद झाले होते. आम्हीही ठरवले होते की, आम्ही स्वतःच्या खातर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणार नाही.'

सेक्स वर्करसाठी असणारी एसओपी :
-काम करणाऱ्यांचे रुटीन हेल्थ चेकअप करुन घेणे अनिवार्य केले.
-प्रत्येक ग्राहकाला स्क्रीनिंग आवश्यक.
-ग्राहकांनी नेहमी मास्क घालायचा आहे.
-सॅनिटाइझर, मास्क आणि हँडग्लोस कंडोमप्रमाणे अनिवार्य.
-व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महिला आपल्या अडचणी शेअर करु शकतात.
-प्रत्येक ब्रोथलवर कमीत कमी 2 टेंपरेचर गन असाव्यात.
-महिला, मुलं आणि वृद्धांची वेळोवेळी स्क्रीनिंग.
-कोरोनाचे लक्षण आढळल्यावर महिलांना आयसोलेट केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com