पुणे विभागात 33 तालुक्यामधील भूजल पातळीत घट

0water_level.jpg
0water_level.jpg

पुणे : पुणे विभागातील एकूण 57 तालुक्यांपैकी 31 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत दोन मीटरपर्यंत तर, दोन तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर, उर्वरित 24 तालुक्यांमध्ये भूजल पातळी एक मीटरने वाढल्याची माहिती समोर आली आहे. 
भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागातील 57 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. मार्चअखेर सर्वेक्षण केलेल्या अहवालानुसार, सातारा जिल्ह्यातील माण आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दोन तालुक्‍यांत भूजलपातळीत दोन ते तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट होणे हे चिंताजनक मानले जाते.

पुणे जिल्ह्यातील भोर, खेड, वेल्हा, जुन्नर आणि दौंड या तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत आणि आंबेगाव, हवेली, बारामती, इंदापूर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये भूजल पातळीत एक ते दोन मीटरने घट झाली आहे. सातारा जिल्ह्यात खटाव आणि महाबळेश्वर तालुक्यात शून्य ते एक मीटरने, खंडाळा आणि फलटण तालुक्यात एक ते दोन मीटरने भूजल पातळी घटली आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव, शिराळा, वाळवा, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी आणि खानापूर तालुक्यात भूजल पातळी एक मीटरपर्यंत घटली आहे. तर जत तालुक्यात भूजल पातळी दोन मीटरने घटली आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात एक मीटरने तर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, करमाळा आणि माढा तालुक्यातील भूजल पातळी दोन मीटरपर्यंत घटली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड आणि गगनबावडा तालुक्यात एक मीटरपर्यंत भूजल पातळी घटली आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या उन्हाळ्यात पुणे विभागातील 24 तालुक्यामध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे त्यात 22 तालुक्यामध्ये 0 ते 1 मीटर पर्यंत आणि दोन तालुक्यांमध्ये एक ते दोन मीटरपर्यंत भूजल पातळी वाढली आहे. मिरज आणि पंढरपूर या दोन तालुक्यांमध्ये एक भूजल पातळीत एक ते दोन मीटरने वाढ झाली आहे. तर शून्य ते एक मीटरपर्यंत भूजल पातळी वाढलेल्या तालुक्यांमध्ये मावळ, मुळशी, पुरंदर कराड, सातारा, जावळी, पाटण, कोरेगाव, वाई, पलूस, मंगळवेढा, मोहोळ, शाहुवाडी, पन्हाळा, शिरोळ, भुदरगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल आणि करवीर या तालुक्यांचा समावेश आहे.

''भूजल पातळी घटलेल्या तालुक्यांमध्ये पाणी उपशावर नियंत्रण आणले पाहिजे. तसेच जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत जलधर व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसहभागातून पुनर्भरण योजना राबविण्याची गरज आहे. काही तालुक्यांमध्ये लघु आणि उपसा सिंचन योजनांमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.''
- डॉ. मिलिंद देशपांडे, प्रादेशिक उपसंचालक तथा प्रभारी सहसंचालक (भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com